चार मुलांची आई दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली, स्वतः नवऱ्याने दिलं प्रियकराशी लग्न लावून! मुलांची जबाबदारीही घेतली

करवाचौथच्या आधी पत्नीने नवऱ्याला सांगितलं की, माझं दुसऱ्यावर प्रेम आहे आणि त्याच्यासोबत राहायचं आहे.

चार मुलांची आई दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली, स्वतः नवऱ्याने दिलं प्रियकराशी लग्न लावून! मुलांची जबाबदारीही घेतली
Bihar marriage
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 16, 2022 | 2:54 PM

सोशल मीडियावर एक आश्चर्यजनक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील एका पतीने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. नवरा-बायकोचं नातं खूप गोड असतं. दोघांचेही नाते पवित्र असते, असे म्हटले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पती-पत्नी सात जन्मांसाठी बांधले जातात. पण हे उदाहरण या सगळ्याला अपवाद आहे. करवाचौथच्या आधी पत्नीने नवऱ्याला सांगितलं की, माझं दुसऱ्यावर प्रेम आहे आणि त्याच्यासोबत राहायचं आहे. यानंतर पतीनं सरपंच आणि गावच्या प्रमुखाला बोलावून घेतलं आणि ग्रामस्थांसमोरच पत्नीचं लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला 4 मुलंही आहेत. एवढं सगळं करूनही नवऱ्याने बायकोला सांगितलं की, तु लग्न कर, मी मुलांची काळजी घेईन.

ही संपूर्ण कहाणी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील आहे. भागलपूरच्या सुलतानगंजमधील गंगानिया गावात राहणाऱ्या या व्यक्तीचं आणि त्याच्या पत्नीचं लग्न 10 वर्षांपूर्वी झालं होतं.

मात्र 10 वर्षांची असूनही ही महिला आपल्या माहेरी एका मुलाच्या प्रेमात पडली. तेव्हा तिने पतीला ही सगळी खरी माहिती दिली. पतीनेही होकार देत त्या मुलाला आपल्या पत्नीसाठी लग्नाची मागणी घातली आणि त्यांचं लग्न लावून दिलं.

पूजा ही बिहारमधील बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे. 2012 मध्ये तिचा विवाह भागलपूरच्या गंगानिया गावातील श्रावणशी झाला होता. त्यावेळी पूजा १६ वर्षांची होती.

पूजा लग्नानंतर अनेकदा आपल्या माहेरी येत असे. छोटू (26) चं आजोळ पूजाच्या घरा शेजारी होतं. पाच वर्षांपूर्वी दोघांमध्ये अफेअर सुरू होतं.

हळूहळू त्यांचं प्रेम इतकं फुलू लागलं की, पूजाने आपल्या चार मुलांना सोडून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.