Video | आधी बर्फावर रॅम्प वॉक, नंतर असं घडलं की मध्येच वाघाची शिट्टी गुल; पाहा व्हिडीओ

सर्वांत हिंस्त्र प्राणी म्हणून ओळख असलेल्या वाघाचा एक व्हिडीओ जास्तच व्हायरल होत आहे. (tiger walking on ice viral video)

Video | आधी बर्फावर रॅम्प वॉक, नंतर असं घडलं की मध्येच वाघाची शिट्टी गुल; पाहा व्हिडीओ
TIGER VIRAL VIDEO
| Updated on: Apr 14, 2021 | 5:17 PM

मुंबई : सोशल मीडिया हे अमर्याद आणि विस्तीर्ण असे माध्यम आहे. या ठिकाणी एका क्षणाला लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये काही व्हिडीओ हे मजेदार, तर काही थरारक असतात. प्राण्यांचे, पक्ष्यांचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर मोठ्या चवीने पाहिले जातात. वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांचे व्हिडीओ तर कमी वेळात जास्त लोकप्रिय होताना आपण नेहमीच पाहतो. सध्या सर्वांत हिंस्त्र प्राणी म्हणून ओळख असलेल्या वाघाचा असाच एक व्हिडीओ जास्तच व्हायरल होत आहे. या वाघाची झालेली फजिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Tiger walking on ice video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सध्या सोशल मीडियावर एका वाघाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा वाघ बर्फावर चालताना दिसतोय. मोठ्या दिमाखात तो बर्फावरुन चालतोय. मात्र, एक पाऊल टाकताच वाघासमोरचा बर्फ फुटतो. त्याचं ऐटदार चालणं पाहून तो रॅम्प वॉक करतोय की काय, असा वाटतं आहे. मात्र, याच वेळी हा वाघ बर्फावरुन चालत असताना थेट बर्फाखालच्या पाण्यामध्ये पडला आहे. चालताना पायाखालचा बर्फ अचानक फुटल्यामुळे वाघासोबत हा अपघात झाला आहे. या प्रकारामुळे मोठ्या ऐटीत चालणाऱ्या वाघाची पुरती धांदल उडाली आहे. पाण्यात पडल्यानंतर हा वाघ मोठ्या मुश्किलीने पाण्याच्या बाहेर येताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर Nature & Animals या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड करताच, त्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. सध्या या व्हिडीओला एकूण 1 लाख 70 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच वाघाची झालेली फजिती पाहून अनकेजण मजेदार कमेंट्ससुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

साडे 7 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी धोकादायक सापांमध्ये बसला, पुढे काय झालं? पाहा Viral Video

Video | नदीच्या मधोमध करत होता सुनील शेट्टीची नक्कल, गर्लफ्रेंडने मारली लाथ, पाहा पुढे काय झालं…

5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच

(Tiger walking on ice video goes viral on social media)