AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडे 7 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी धोकादायक सापांमध्ये बसला, पुढे काय झालं? पाहा Viral Video

लोकप्रिय यूट्यूबर (YouTuber) मिस्टर बीस्ट (MrBeast) आपल्या आगळ्यावेगळ्या आणि अचंबित करुन सोडणाऱ्या व्हिडीओसह परत आलाय.

साडे 7 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी धोकादायक सापांमध्ये बसला, पुढे काय झालं? पाहा Viral Video
| Updated on: Apr 14, 2021 | 4:49 AM
Share

वॉशिंग्टन : लोकप्रिय यूट्यूबर (YouTuber) मिस्टर बीस्ट (MrBeast) आपल्या आगळ्यावेगळ्या आणि अचंबित करुन सोडणाऱ्या व्हिडीओसह परत आलाय. यावेळी त्याने काही चॅलेंज ठेवले आणि ते जिंकणाऱ्यांना भरपूर पैसेही वाटलेत. पैजेची रक्कम जिंकण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना आणि सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना हदरवून सोडणारे स्टंट करायला लावले. त्यातील एका स्टंटमध्ये धोकादायक साप्यांच्या बाथटबमध्ये बसायचं होतं, तर एका स्टंटमध्ये टारेंटयुला या विषारी प्राण्याला 30 सेकंद स्वतःच्या अंगावर खेळू द्यायचं होतं (Youtuber Mr Beast viral video challenging friends to sit with snake).

रविवारी (11 एप्रिल) यूट्यूबवर (YouTube) पोस्ट केलेल्या व्हिडीओत 22 वर्षीय डोनल्डसनने त्यांने दिलेले चॅलेंज पूर्ण करणाऱ्यांना हजारो डॉलर बक्षिस म्हणून दिलेत. आपल्या पहिल्या पैजेत त्याने आपल्या तीन मित्रांना टबमधील सापांमध्ये बसण्याचं चॅलेंज दिलं. हे चॅलेंज पूर्ण केल्यास तुमच्या आईला 10 हजार डॉलर म्हणजेच साडेसात लाख रुपये देईल असंही जाहीर केलं.

डोनल्डसनने आपल्या या व्हिडीओला नाव दिलंय, “10,000 डॉलरसाठी तुम्ही सापांसोबत बसाल का?” त्याच्या या पैजेत किती लोकांनी सहभाग घेतला, किती लोक जिंकले आणि किती लोकांनी पैजेच्या रकमा जिंकल्या हे पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ पाहा.

हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केल्यानंतर आतापर्यंत 2 कोटी 74 लाखांपेक्षा अधिक वेळा तो पाहिला गेलाय. या व्हिडीओखाली कमेंटचा तर अगदी पाऊस पडलाय. अनेकांनी या भन्नाट व्हिडीओसाठी डोनल्डनने आभार व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलं, “तु खूपच चमत्कारिक आहेस”

दुसऱ्याने म्हटलं “जिमी आणि बीस्ट टीम आता अधिकृतपणे आमच्या युगातील सर्वात मोठी कंटेट क्रिएटर्स टीम झालीय. आता तुम्ही माझं मत बदलू शकत नाही.”

MrBeast च्या YouTube चॅनलचे 59 मिलियन म्हणजेच 5 कोटी 90 लाख पेक्षा अधिक सब्सक्रायबर्स आहेत. डोनल्डसनने 2017 चे यूट्यूब व्हिडीओ “I COUNTED TO 100000!” या नावाने प्रसिद्ध झाले होते. त्याला 2 कोटी पेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलंय.

हेही वाचा :

Video | नदीच्या मधोमध करत होता सुनील शेट्टीची नक्कल, गर्लफ्रेंडने मारली लाथ, पाहा पुढे काय झालं…

VIDEO | प्रबळ इच्छाशक्तीपुढे दिव्यांगत्वही हरलं, व्हिडीओ पाहून अरविंद केजरीवाल म्हणाले…

5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच

व्हि़डीओ पाहा :

Youtuber Mr Beast viral video challenging friends to sit with snake

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.