#BloodMoon : कुठे लाल, तर कुठे पिवळा, वर्षातील पहिल्या आणि शेवटच्या Supermoon चे मनमोहक फोटो

| Updated on: May 27, 2021 | 6:43 AM

संपूर्ण देशभरातील खगोलप्रेमींसाठी सुपरमूनची विलक्षण पर्वणी ठरली. (Total lunar eclipse First  blood moon and supermoon Of 2021 best Images)

#BloodMoon : कुठे लाल, तर कुठे पिवळा, वर्षातील पहिल्या आणि शेवटच्या Supermoon चे मनमोहक फोटो
supermoon
Follow us on

मुंबई : यंदाच्या वर्षात भारतातील पहिल्या आणि शेवटच्या सूपरमूनचे (Total lunar eclipse ) काल (26 मे) दर्शन झाले. हे पूर्ण चंद्रग्रहण असल्याने काल चंद्र पृथ्वीच्या 3 लक्ष 57 हजार 310 किमी जवळ आला होता. त्यामुळे तो मोठा आणि नेहमीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुपरमून दिसू लागला. संपूर्ण देशभरातील खगोलप्रेमींसाठी सुपरमूनची विलक्षण पर्वणी ठरली. (Total lunar eclipse First  blood moon and supermoon Of 2021 best Images)

भारतातील काही भागात आंशिकरित्या चंद्रग्रहण दिसले. या चंद्रग्रहणाला दुपारी 2 वाजून 7 मिनिटांनी प्रारंभ झाला. तर संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंत ग्रहण होते. यावेळी भारताच्या अनेक भागातून चंद्र हा आकाराने मोठा दिसत होता. तर काही ठिकाणी तो लाल तर काही भागात तो पिवळ्या रंगात पाहायला मिळत होता. यामुळे खगोलप्रेमींसाठी ही विशेष पर्वणी ठरली.

(Total lunar eclipse First blood moon and supermoon Of 2021 best Images)

संबंधित बातम्या : 

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टी दान करा, नोकरी, संतान प्राप्ती आणि आर्थिक समस्या होईल दूर

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान ही कामं करा, घरात सुख-समृद्धी नांदेल