Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान ही कामं करा, घरात सुख-समृद्धी नांदेल

हिंदू धर्मात ग्रहणासंबंधित अनेक मान्यता आहेत (Chandra Grahan 2021). या ग्रहणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव देखील पडतो. आज वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे छाया चंद्रग्रहण आहे.

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणादरम्यान ही कामं करा, घरात सुख-समृद्धी नांदेल
chandra grahan
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 1:40 PM

मुंबई : हिंदू धर्मात ग्रहणासंबंधित अनेक मान्यता आहेत (Chandra Grahan 2021). या ग्रहणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव देखील पडतो. आज वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे छाया चंद्रग्रहण आहे. ज्यामध्ये सुतक कालावधी नसेल. चंद्रग्रहणाची वेळ दुपारी 3:15 ते संध्याकाळी 7.19 पर्यंत असेल. यावेळी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्याचवेळी, अशी काही कामे आहेत जी चंद्रग्रहणाच्या वेळी केल्यामुळे फायदाही होतो. चंद्रग्रहणावेळी काय केले पाहिजे ते जाणून घेऊया (Chandra Grahan 2021 Do These Things During Lunar Eclipse For Prosperity And Happiness)-

चंद्रग्रहणावेळी हे उपाय करा –

1. असे मानले जाते की चंद्रग्रहणाच्या वेळी तुळशीची पाने आधीपासून तयार केलेल्या अन्नात घालावी. याने अन्न शुद्ध राहाते आणि ते केले नाही तर उर्वरित अन्न खाऊ नये. याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

2. चंद्रग्रहणाच्यावेळी आपल्या कुल देवतेचं स्मरण करुन 108 वेळा मंत्र जप करावा. यामुळे ग्रहणाचा परिणाम होणार नाही.

3. चंद्रग्रहणानंतर आंघोळ करुन स्वच्छ कपडे घालावे. या काळात प्राणी, पक्षी आणि गरजू लोकांना दान केल्यास शुभ परिणाम मिळतो.

4. चंद्रग्रहणादरम्यान शिवलिंगावर पाणी अर्पित करावे. त्याचवेळी ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करा. असे केल्याने चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम होणार नाही.

5. मान्यता आहे की, ग्रहणावेळी गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नये. याशिवाय झोपतानाही नारळ हातात असावे.

6. चंद्रग्रहणावेळी सत्यनारायणाची कथा ऐकणे शुभ असते. ही कथा ऐकल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात.

7. ग्रहणाच्या दिवशी घरात किंवा बाहेर कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा.

ज्योतिषशास्त्रानुसार, धन प्राप्ती, आर्थिक समस्या, आनंद आणि समृद्धी यासाठी बरेच लोक या दिवशी विशेष उपाय करतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, ग्रहणावेळी चांदीचा एक तुकडा दुधात टाकून त्याला ग्रहणाच्या सावलीत ठेवा. ग्रहण संपल्यानंतर तो तुकडा घ्या आणि घराच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहील.

Chandra Grahan 2021 Do These Things During Lunar Eclipse For Prosperity And Happiness

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणावेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

Lunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय? जाणून घ्या

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.