AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?

2021 चे पहिले चंद्रग्रहण काहीच तासांवर आलं आहे (Chandra Grahan 2021). ते 26 मे रोजी पूर्व भारतात दिसेल. कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील.

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?
Chandra-Grahan-2021
| Updated on: May 25, 2021 | 8:52 AM
Share

मुंबई : 2021 चे पहिले चंद्रग्रहण काहीच तासांवर आलं आहे (Chandra Grahan 2021). ते 26 मे रोजी पूर्व भारतात दिसेल. कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण दुपारी 3:15 च्या सुमारास सुरु होईल आणि संध्याकाळी 6:22 वाजता समाप्त होईल. रिपोर्टनुसार, सुपर मून केवळ 14 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत असेल. चंद्रग्रहण कसे पहावे आणि कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल जाणून घ्या (Chandra Grahan 2021 How To Watch Eclipse And What Precautions Should Take)-

चंद्रग्रहण कसे पहावे?

दुर्बिण

जर आपल्याला एखाद्या ग्रहणादरम्यान चंद्राची वैशिष्ट्ये पाहण्याची इच्छा असेल असेल तर आपल्यासाठी दूर्बिण सर्वात चांगला पर्याय आहे. जेव्हा पृथ्वीची छाया त्यावर पडते तेव्हा दुर्बिणीद्वारे आपण चंद्राच्या रंगातील बदल सहजपणे पाहू शकता. चंद्राच्या भोवतालच्या निळ्या रंगाचे पट्टे पाहण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ पूर्ण चंद्रग्रहणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी चंद्राकडे पहाण्याचे सूचित करतात.

टेलीस्कोप

जर आपल्याला फायनर डिटेल्समद्ये चंद्र बघायचा असेल तर टेलीस्कोप हा आणखी एक चांगला पर्याय आहे. ग्रहण काळात चंद्राचे मोठे चित्र मिळविण्यासाठी आपण आपल्या डीएसएलआर कॅमेर्‍याशी टेलीस्कोप कनेक्ट करु शकता.

कॅमेरा

आपल्याला चंद्रग्रहणाचे फोटो क्लिक करण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही. कोणताही कॅमेरा किंवा मोबाईल फोन कॅमेरा चंद्राचे फोटो घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

ट्रायपॉड आणि केबल रिलीझ

जर आपण लांब फोकल लेंथ शॉट्स किंवा लांब एक्सपोझर घेण्यासाठी उत्सुक असाल तर, एक ट्रायपॉड किंवा केबल रिलीझ सोबत ठेवा. दुर्बिण किंवा कॅमेरा स्थिर ठेवण्यास ते आपल्याला मदत करतात.

अतिरिक्त बॅटरी

सर्वात सुंदर खगोलीय घटना – चंद्रग्रहणाच्या शूटिंग दरम्यान आपल्याला आपली बॅटरी संपायला नको. म्हणून, सर्व बैटरी चार्ज असल्याची खात्री करा आणि अतिरिक्त बॅटरी ठेवा.

फ्लॅशलाईट

एक फ्लॅशलाईट असणे महत्वाचे आहे. कारण हे आपल्याला आकाशातील अंधारात आपला मार्ग शोधण्यात मदत करते.

चंद्रग्रहण पाहण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी?

खगोलशास्त्रज्ञांच्या मते सूर्यग्रहणाच्या विपरीत चंद्रग्रहण पाहण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपण चंद्र पाहू शकता. पण, चंद्रग्रहण पाहाणे आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणामांबाबत अनेक मान्यता आहेत. काही प्रमुख मान्यता जाणून घेऊ –

• गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहणे टाळावे आणि घरातच राहावे, कारण मान्यता आहे की त्याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.

• यावेळी आपण स्वयंपाक करणे आणि अन्न ग्रहण करणे टाळावे.

• प्रवास टाळावा.

Chandra Grahan 2021 How To Watch Eclipse And What Precautions Should Take

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lunar Eclipse 2021 | या महिन्याच्या अखेरीस वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Lunar Eclipse 2021 | वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे रोजी, जाणून घ्या याबाबतच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.