
या व्हिडीओमध्ये एक ट्रेन रुळावर धावताना दिसतीये. ही ट्रेन इतकी खचाखच भरलेली आहे की ती अक्षरशः दिसतंही नाही, नुसतीच गर्दी दिसते, लोकं दिसतात. हा व्हिडिओ बांगलादेशातील असल्याचं सांगण्यात येत आहे. बांगलादेश मधला असा व्हिडीओ पहिल्यांदाच व्हायरल झालेला नाही. या आधीही अनेकदा झालाय. हा व्हिडीओ बघून तर लोकांना अक्षरशः धक्का बसलाय.
ट्रेनच्या छतापासून खिडक्यांपर्यंत प्रत्येक कोपऱ्यात फक्त माणसंच दिसतात. गर्दी असली तरी लोकं कधी छतावर चढतात, कधी खिडकीत बसतात, दरवाज्यात लटकतात.
This is just crazy. pic.twitter.com/EN24A8F48g
— Naila Inayat (@nailainayat) October 6, 2022
लोक ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक लोक आपल्या प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
अवघ्या 59 सेकंदाचा हा व्हिडिओ अनेकदा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी (सोशल मीडिया युजर्स) देखील याला पसंती दर्शवली आहे. काहींनी याला गरिबी आणि लोकसंख्येचा स्फोट असं म्हटलंय.