
सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी खेळाशी संबंधित व्हिडिओ तर कधी भांडणाचा व्हिडिओ. असे काही व्हिडिओ आहेत जे खूप मजेदार आहेत, तर काही व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित देखील करतात. आपण पाहिले असेल की कधीकधी लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरही रागावतात आणि मारहाण करण्यास तयार होतात. त्यातही, आजूबाजूला बसलेले किंवा उभे असलेले लोक त्यांना फक्त भांडताना पाहतात आणि व्हिडिओ बनवत राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मेट्रोच्या आत दोन लोक प्रचंड मारहाण करताना दिसतायत.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मेट्रोच्या आत दोन लोक कसे भिडले आहेत आणि जबरदस्त हाणामारी करत आहेत.
सुरुवातीला असं वाटतं की दोघांमध्ये समान भांडणं होतात, पण नंतर टी-शर्ट घातलेली व्यक्ती शर्ट घातलेल्या व्यक्तीवर भारी पडते.
तो दुसऱ्यावर इतके पंच मारतो की मोजणे कठीण होऊन बसते. नंतर तर तो त्याला लाथा मारू लागतो. या दरम्यान आणखी बरेच लोक मेट्रोमध्ये चढतात, पण त्यांची भांडणं कुणीही थांबवत नाही.
लोक तमाशा पाहत राहतात आणिहे भांडण त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात मग्न असतात. हे दृश्य कॅलिफोर्निया मेट्रोचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेट्रोतील या जोरदार भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Baharikekalesh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय.
Kalesh Inside California metro pic.twitter.com/kou7CQSQGk
— BaharKeKalesh (@Baharikekalesh) November 8, 2022
अवघ्या 56 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाख 38 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केलाय.