बाबोSSS..नवरे दोन अन् बायको एक! भारतात आजही अस्तित्वात आहे अशी अनोखी विवाहप्रथा; कारण वाचून व्हाल थक्क

एक घरात दोन भाऊ असतील, दोघांची वेगवेगळी लग्न होतात. संसार वेगळे थाटले जातात. पण काही पारंपारिक समुदायांमध्ये चित्र अगदी वेगळं आहे. इथे एकाच महिलेशी दोन किंवा तीन भाऊ लग्न करतात. जाणून घ्या सविस्तर

बाबोSSS..नवरे दोन अन् बायको एक! भारतात आजही अस्तित्वात आहे अशी अनोखी विवाहप्रथा; कारण वाचून व्हाल थक्क
| Updated on: Nov 25, 2026 | 9:27 PM

एक घरात दोन भाऊ असतील, दोघांची वेगवेगळी लग्न होतात. संसार वेगळे थाटले जातात. पण हिमालयातील काही पारंपारिक समुदायांमध्ये चित्र अगदी वेगळं आहे. इथे एकाच महिलेशी दोन किंवा तीन भाऊ लग्न करतात. म्हणजे एकच पत्नी आणि तिचे अनेक पती. ही प्रथा ऐकायला विचित्र वाटत असली तरी तिथल्या काही महिला आजही ही प्रथा पाळतात. जाणून घ्या त्या गावाबद्दल

या प्रथेल फ्रॅटर्नल पॉलीअँडी म्हणजेच बंधुभावातील बहुपतित्व म्हटलं जातं. याला स्थानिक भाषेत ‘जोडीदारा’ (Jodidara) किंवा ‘द्रौपदी प्रथा’ असे म्हणतात. ही प्रथा प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही आदिवासी जमातींमध्ये पाळली जाते.हट्टी जमात, किन्नौरा जमात, जौनसारी जमात , इतर डोंगरी जमाती ही प्रथा पारंपरिक स्वरूपात आढळते.

Loading...

नेमकी कशी असते ही प्रथा?

समजा एका कुटुंबात तीन सख्खे भाऊ आहेत. पारंपरिक पद्धतीनुसार या तिघांचं लग्न एकाच महिलेशी होऊ शकतं. लग्नानंतर ती महिला तिन्ही भावांची पत्नी मानली जाते.तिघेही एकाच कुटुंबाचा भाग म्हणून राहतात. घर,शेती, जनावरं आणि संसाराची जबाबदारी एकत्र सांभाळली जाते. मात्र प्रत्येक कुटुंबात हीच पद्धत असेल असं नाही. काही विवाह एकाच वेळी अशा स्वरूपात ठरवले जात. तर काही ठिकाणी सुरूवातीला एका भावाचं लग्न होऊन नंतर इतर भाऊही त्या वैवाहिक नात्याचा भाग होत असतं.

एका महिलेशी अनेक भावांनी लग्न करण्यामागचं कारण काय?

या प्रथेमागे सर्वात मोठं कारण ते म्हणजे जमिनीची होणारी विभागणी . हिमालयातील डोंगराळ भागात शेतीयोग्य जमीन मर्यादित होती. जमीनीही अनेकदा लहान लहान तुकड्यांमध्ये विभागलेली असे.अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक भावाने स्वतंत्र लग्न आणखी तुकडे झाले असते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला मिळणारी जमीन कमी झाली असती.

यावर उपाय म्हणून काही कुटुंबांनी सर्व भावांनी एकाच महिलेशी लग्न करण्याची पद्धत स्वीकारली. त्यामुळे जमीन एकाच कुटुंबाकडे राहायची, शेतीची कामं एकत्र व्हायची आणि घरातील आर्थिक जबाबदारीही भावांमध्ये विभागली जायची.

या प्रथेमुळे कुटुंबाला काय फायदा व्हायचा?

  1. वडिलोपार्जित जमिनीची विभागणी टाळता यायची.
  2. शेती आणि जनावरांची देखभाल करण्यासाठी माणसं अधिक मिळत होती
  3. घरातील कमाई आणि संसाधन एकत्र ठेवता यायची.
  4. स्वतंत्र कुटुंब निर्माण झाल्यामुळे होणारा आर्थिक ताण कमी व्हायचा

 

आजही ही प्रथा सुरू आहे का?

आधुनिक शिक्षण, बदलती जीवनशैली, रोजगाराच्या नव्या संधी आणि समाजातील काही बदलांमुळे अशा विवाहाचं प्रमाण कमी झालं आहे. किन्नौरमधील एका संशोधनानुसार अशा प्रकारच्या विवाहात घट झाल्याचे दिसून आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us