Viral Video : थायलंडमध्ये जाऊन मगरीच मांस खाणं सरकारी अधिकाऱ्याला पडलं महाग VIDEO
मध्य प्रदेशातील उज्जैन महानगरपालिकेचे भवन अधिकारी राजकुमार राठोड थायलंड दौऱ्यादरम्यान पत्नीसह मगरीचे मांस खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

आज काल कुठेही फिरायला गेला, काही केलं कि माणसाला व्हिडिओ शूट करायचाचं असतो. तिथपर्यंतच नाही तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायचीच हौसच असते काही लोकांना. अशी हौस एका उज्जैनच्या अधिकाऱ्याच्या अंगाशी आली आहे. हा पठ्ठ्या थांयलंडला गेला, तिथे त्याने मगरीच मांस खाल्ल आणि काय व्हिडिओ केला सोशल मीडियावर अपलोड.बरं आता मांस खाल्ल म्हणून अडचण निर्माण तर झालीच पण परदेशात जाण्याच्या परवानगीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मध्य प्रदेशातील उज्जैन महानगरपालिकेत अधिकारी राजकुमार राठोड हे भवन अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्याकडे महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 1,2 आणि 3 ची जबाबदारी आहे. दरम्यान थायलंडच्या सुट्टीवर असताना त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मगरीचे मांस चाखतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हाच व्हिडिओने वादाची ठिणगी पेटवली.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे अधिकारी आणि त्याची बायको एका स्ट़ॉलसमोर उभे आहेत. त्या स्टॉलवर वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस दिसत आहे. तिथेच हे कपल मगरीचे मांस चाखत आहे असे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ अधिकाऱ्याच्या पत्नीचे शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. आता हाच व्हिडिओ इतर अधिकाऱ्यापर्यंतही पोहोचला. त्यामुळे सर्वांना आश्चर्यांचा धक्का बसला.
पण वाद हा वेगळाच
मगरीच मांस उज्जैनच्या एका अधिकाऱ्याने चाखलं म्हणून व्हिडिओ व्हायरल झाला पण वाद वेगळ्याच कारणाने निर्माण झाला तो म्हणजे सुट्टी.अधिकारी राजकुमार राठोड याने 19 ते 23 ऑक्टोबरदरम्यान सुट्टी घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार परदेशात जाण्याचा कोणताही उल्लेख अर्जात नव्हता. अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अभिलाषा मिश्रा यांनी सांगितले.
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परदेशात जाण्यापूर्वी संबंधित सक्षम् अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे राठोड यांनी ही परवानगी घेतली होती का? याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात राजकुमार राठोड यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे परदेश दौऱ्याची परवानगी घेतली होती की नाही? याबाबत चौकशीतून माहिती समोर येईलच.