Viral Story: ‘देवा! कमीत कमी ग्राहक येऊ दे’, दुकानासमोर अजब बोर्ड, मालकाची हतबलता वाचून सुन्न व्हाल!

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर दुकानात महिलांना एन्ट्री नाही तसेच देवा कमीत कमी गिऱ्हाईक येऊ दे, असं साकडे घालणारा बोर्डच लावला आहे.

Viral Story: देवा! कमीत कमी ग्राहक येऊ दे, दुकानासमोर अजब बोर्ड, मालकाची हतबलता वाचून सुन्न व्हाल!
| Updated on: Nov 08, 2026 | 5:49 PM

UP Viral Grocery Shop Post:  आपल्या दुकानात गिऱ्हाईकांची रांग असावी, व्यवसायाची भरभराट व्हावी, ग्राहकांनी तुफान गर्दी करावी, असं प्रत्येक व्यावसायिकाला वाटते. मात्र माझ्या दुकानात गिऱ्हाईक नको म्हणून एखाद्या दुकानदाराने देवाला साकडं घातलं तर? अशक्य वाटणारा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर दुकानात महिलांना एन्ट्री नाही तसेच देवा कमीत कमी गिऱ्हाईक येऊ दे, असं साकडे घालणारा बोर्डच लावला आहे. मात्र या अजब निर्णयामागचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हालं!

हतबल दुकानदाराची व्यथा, का घेतला असा निर्णय? 

Loading...

सोशल मीडियावर हा बोर्ड व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही बुचकळ्यात पडले. लोकांनाी याबाबत दुकानाचे मालक घनश्याम बाबा यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलेली व्यथा सर्वांनाच विचार करायला लावणारी होती. त्यांनी सांगितले की, हा प्रसिद्धीचा स्टंट नव्हता, तर एक गरज होती.

खरे तर, संध्याकाळ होताच दारुडे त्यांच्या दुकानाभोवती जमा होत असत. हे नशेत असलेले पुरुष येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचा अश्लील आणि उद्धटपणे अपमान करत असत. या रोजच्या कटकटीला आणि परिसरातील बिघडत चाललेल्या वातावरणाला कंटाळून बाबांनी हे टोकाचे पाऊल उचलले. जर महिला दुकानात आल्या नाहीत, तर दारुडे काही त्रास देणार नाहीत या विचाराने त्यांनी हा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर रंगल्या चर्चा! 

दरम्यान, आता सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावरुन उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी बाबांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. कारण त्यांच्या मते त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या कमाईची पर्वा केली नाही. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी गुन्हा कोणीतरी करतो आणि शिक्षा दुसरा कोणीतरी भोगतो?” दारुड्यांच्या गुंडगिरीसाठी महिलांना शिक्षा का व्हावी? असं थेट मत व्यक्त केले आहे.न रस्त्यावरील टवाळ मुलांना आणि दंगलखोरांना हाताळणे हे पोलीस आणि प्रशासनाचे काम आहे, महिलांवर निर्बंध लादणे नव्हे, असे म्हणत काही नेटकऱ्यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us