UPSC Aspirant ची दुचाकी झाली फेमस!

बाईकचा हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विट केला आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले - All The Best

UPSC Aspirant ची दुचाकी झाली फेमस!
UPSC Aspirant
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 06, 2022 | 3:30 PM

यूपीएससीची परीक्षा किती कठीण आहे हे आपल्या सर्वांनाच चांगलंच ठाऊक आहे. प्रत्येकाला ती परीक्षा देऊन मोठा अधिकारी व्हायची इच्छा असते. या प्रोसेसमध्ये अनेक विद्यार्थी निराश होतात. अनेकांना यात यश देखील मिळाले. एक फोटो व्हायरल होतोय ज्यामुळे आयएएस अधिकारी अवनीश शरण खूप प्रभावित झालेत. त्यांनी हा फोटो ट्विट सुद्धा केलाय. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

व्हायरल होणारा हा फोटो एका बाईकचा आहे. ज्यावर लिहिले आहे की, “UPSC Aspirant” आता हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

बाईकचा हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विट केला आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले – All The Best

ही बातमी लिहिल्यापासून आठ हजारांहून अधिक लोकांनी हे चित्र पसंत केले आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी हा फोटो पुन्हा ट्विट केला आहे आणि लोक या फोटोवर कमेंट करत स्वत:च्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युझरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘आता याचे चलान कापायची हिंमत कोणात आहे..!