AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलच्या कुटुंबाकडून मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, कुटुंब..

Palash Muchhal Sister Palak Muchhal : स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न ऐन लग्नाला काही तास शिल्लक असताना मोडले. त्यानंतर आता पलाशच्या बहिणीने मोठा खुलासा केला.

स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलच्या कुटुंबाकडून मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, कुटुंब..
Palash Muchhal Smriti Mandhana
| Updated on: Dec 12, 2025 | 8:40 AM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील फॉर्महाऊसवर 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर तिने संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. संगीत, हळद आणि पलाशच्या नावाची मेहंदीही स्मृती मानधना हिने हातावला लावली. लग्नाला काही तास शिल्लक असताना असे काही घडले की, थेट हे लग्न मोडल्याचे जाहीर केले. सुरूवातीला स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब असल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सर्वांना सांगितले. स्मृती मानधनाच्या वडिलांपाठोपाठ पलाश मुच्छल यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वडिलांच्या तब्येतीचे फक्त कारणच सांगण्यात आले. खरे कारण काहीतरी वेगळेच लग्न पुढे ढकलण्याचे असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या.

शेवटी स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याचे सांगितले आणि हा विषय माझ्यासाठी इथेच संपल्याचेही तिने स्पष्ट शब्दात सांगितले. पलाश मुच्छल याने स्मृती मानधना हिला धोका दिल्याचे सांगितले जाते. यादरम्यान त्याचे काही स्क्रीनशॉर्टही व्हायरल होताना दिसली. स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर केल्यानंतर पलाश यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले.

आता भावाचे लग्न स्मृती मानधना हिच्यासोबत मोडल्यानंतर पहिल्यांदाच पलाश मुच्छल याच्या बहिणीने यावर भाष्य केले. कुटुंबात नक्की काय सुरू आहे हे देखील तिने सांगितले. पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छल ही मेहंदी, संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसली. आता तिने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पलक स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली.

पलक मुच्छल म्हणाली की, कुटुंबासाठी हा खरोखरच अत्यंत कठीण काळ आहे. हळूहळू करून संपूर्ण कुटुंब आता यामुळे बाहेर येत आहे. सकारात्मक गोष्टींवर आमचा विश्वास आहे. सकारात्मक गोष्टी होतील. सर्व परिस्थितीला आम्ही ताकदीने पुढे जात आहोत. पहिल्यांच पलक मुच्छल ही बोलताना दिसली. कुटुंबासाठी नक्कीच कठीण वेळ असल्याचे तिने म्हटले आहे. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न तुटल्यानंतर दोन्ही कुटुंबाला मोठा धक्का बसला. लग्नासाठी आलेले पाहुणे देखील निराश होऊन गेली.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर