AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिसेल तिथे चप्पलने मारा… स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर करताच पलाश मुच्छल प्रचंड अडचणीत, थेट…

Smriti Mandhana and Palash Muchhal's wedding cancelled : क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्या लग्नाकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळाले. पलाश मुच्छलसोबत लग्नाला काही तास शिल्लक असताना लग्न पुढे ढकलण्यात आले.

दिसेल तिथे चप्पलने मारा... स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर करताच पलाश मुच्छल प्रचंड अडचणीत, थेट...
Smriti Mandhana and Palash Muchhal
| Updated on: Dec 08, 2025 | 7:07 PM
Share

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होते. मात्र, लग्नाला काही तास शिल्लक असताना स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि एकच खळबळ उडाली. वडिलांची तब्येत खराब झाल्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापाठोपाठ पलाश मुच्छल यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. पलाशला रूग्णालयात दाखल करताच विविध चर्चांना उधाण आले. सांगलीनंतर पलाशवर मुंबईत उपचार झाले. यादरम्यानच पलाशचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. पलाश स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, यादरम्यान स्मृती मानधना हिने पलाशच्या समर्थनार्थ एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही.

उलट स्मृती मानधना हिने लग्न समारंभातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केली. मात्र, पलाश मुच्छल शेवटपर्यंत व्हिडीओ तशीच ठेवली. 7 डिसेंबर 2025 रोजी स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर केले. यासोबतच हा विषय माझ्यासाठी इथेच संपल्याचेही तिने म्हटले. मात्र, यादरम्यान तिने लग्न मोडण्याचे कोणतेही कारण सांगितले नाही. स्मृती मानधना पाठोपाठ पलाश यानेही एक पोस्ट शेअर केली.

पलाश आपल्या पोस्टमध्ये मुव्ह ऑनबद्दल बोलताना दिसला. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. पलाशसोबत लग्न मोडल्याचे जाहीर केल्यानंतर स्मृती मानधना हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओवर कमेंट करत लोक स्मृती मानधना हिला प्रोत्साहित करत आहेत. आयुष्यात इतके मोठे वादळ आल्यानंतरही ती खंबीरपणे उभी राहिली आणि आता पुढे जात असल्याने लोक तिचे काैतुक करत आहेत.

स्मृती मानधना हिच्यासोबत लग्न मोडल्याने पलाश मुच्छल याला मात्र जोरदार फटका बसल्याचे दिसत आहे. पलाश मुच्छल याच्या जुन्या पोस्टवर लोक कमेंट करत त्याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर जिथे दिसेल तिथे याला चप्पलने मारा अशाही कमेंट त्याच्या सोशल मीडियावर केल्या जात आहेत. पलाश मुच्छल याच्याबद्दल लोकांच्या मनात मोठा संताप दिसत आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.