Video : नर्सिंगची नोकरी सोडून बनली फुलटाइम क्रिएटर; 7 महिन्यांत झाली कोट्यावधींची मालकीण
एका महिलेने नर्सिंगची नोकरी सोडली आणि सोशल मीडियाची वाट धरली. केवळ 7 महिन्यांत इतके पैसे कमावले कि ते तिच्या नर्सिंगच्या पगारापेक्षाही दुप्पट होते.

आजकाल सोशल मीडियावर रील्स बनवणारे, व्हिडिओ टाकणारे अनेक जण दिसतात. काही जण छंद म्हणून हे काम करतात, तर काहीनी यालाच कमाईंचं साधनं बनवलं आहे. सध्या सोशल मीडियावरून इतकी कमाई होते कि आजकाल लोक नोकरीही सोडायला तयार होतात. या नर्स म्हणून काम करणाऱ्य़ा एका महिलेने असंच काहीसं केलं आहे. नर्स म्हणून काम करणाऱ्या सारा अॅन यांनी अवघ्या सात महिन्यातं ब्रँड डील्समधून तब्बल 82 लाख रूपयांची कमाई केली. त्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ कंटेट क्रिएशन करण्याचा निर्णय घेतला.
18 महिन्यांपूर्वी सुरू केला होता प्रवास
सारा अॅन या अमेरिकेतील अॅमेझोना येथे राहते. ती सिंगल मदर असून नर्स म्हणून नोकरी करत होती. जवळपास 18 महिन्यांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर कंटेट तयार करायला सुरूवात केली. सुरूवातीला आपल्या रोजच्या आयुष्यातील नर्स म्हणून काम करतानाचे अनुभव आणि सिंगल पालक म्हणून समोर येणाऱ्या जाणाऱ्या अडचणी ती शेअर करत असते.
सुरूवातीला तिच्या मनातही हा प्रश्न होता की, आपलं साधं आयुष्य लोकांना पाहायला का आवडेल. लोक आपले व्हिडिओ पाहतील का? मात्र हळूहळू त्यांच्या कंटेटला प्रतिसाद मिळू लागला आणि वेगवेगळ्या ब्रँड्सकडून त्यांना कामाच्या ऑफर्स येऊ लागल्या.
7 महिन्यांत 1.75 कोटींचे ब्रँड डिल्स!
सारा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या कमाईचा हिशोब सांगितला. त्यांच्या माहितीनुसार मे ते नोव्हेंबर या सात महिन्यांच्या काळात त्यांनी ब्रँडसोबत एकूण 1 लाख 87 हजार 745 डॉलर म्हणजेच जवळपास 1.75 कोटी रूपयांचे करार केले.
नर्सच्या वर्षभराच्या पगारापेक्षारही जास्त कमाई
सारा हिने सांगितलं की कंटेट क्रिएशनमधून सात महिन्यांत झालेली कमाई नर्स म्हणून मिळणाऱ्या तिच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही जास्त होती. त्यामुळे तिने घेतलेला निर्णय तिच्यासाठी प्रचंड फायद्याचा ठरला. आता त्यांना कंटेट तयार करण्यासोबतच कुटुंबाला ही वेळ देता येणार असल्याचे म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास 82 हजार 700 फॉलोवर्स आहेत. आपल्या प्रवासाबद्दल सांगताना तिने फॉलोवर्सचे देखील आभार मानले आहेत. सोशल मीडियावरून कमाईल करण आपल्यासारख्या सामान्य माणसालाही शक्य आहे. असं वाटणाऱ्यांना सुरूवात करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, हा आपला उद्देश असल्याचं म्हटलं आहे.