Indian Army: व्हिडीओ बघून Salute कराल! देशसेवा करताना अनेक अडचणींना सामोरे जाणारे जवान…

या व्हिडिओमध्ये सैनिक आपल्या रायफलने स्वत:ला बॅलन्स करताना दिसतो.

Indian Army: व्हिडीओ बघून Salute कराल! देशसेवा करताना अनेक अडचणींना सामोरे जाणारे जवान...
Indian army
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 29, 2022 | 5:06 PM

सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओंमध्ये भारतीय लष्कराचे जवान अतिशय कठीण परिस्थितीत देशाचं रक्षण करताना दिसतात. लष्करामध्ये सैनिक असल्याने अतिउष्णता असो किंवा खोल बर्फाच्या आत उभे राहणे असो, अनेक कठीण आव्हानांना या सैनिकांना सामोरे जावे लागते. प्रत्येक ठिकाणी भारतीय सैनिक खंबीरपणे उभे राहतात आणि देशासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार असतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून अभिमानाने छाती रुंदावेल. हा व्हिडिओ बघून तुम्ही सॅल्यूट ठोकाल.

मेजर जनरल राजू चौहान यांनी रायफल घेऊन खोल बर्फात गस्त घालणाऱ्या सैनिकाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओचं लोकेशन आणि वेळ अद्याप कळू शकलेली नसली तरी सैनिकाने दाखवलेलं धाडस कुणालाही गुंगारा देण्यासाठी पुरेसं आहे.

लष्कराचा एक जवान गुडघ्यापेक्षाही उंच बर्फातून चालताना दिसतो. गुडघ्यापर्यंत बर्फात फसलेला हा तरुण पुढे सरकत आहे. त्याला पुढे जाण्यात खूप अडचणी येतात, पण त्याची हिंमत कमी होत नाही आणि तो रायफल घेऊन पुढे सरकतो.

या व्हिडिओमध्ये सैनिक आपल्या रायफलने स्वत:ला बॅलन्स करताना दिसतो. इतकंच नाही तर जेव्हा तो पुढे जात असतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसूही दिसतं. “या तरुण सैनिकाच्या चेह-यावरचं हसू बघा,” असं कॅप्शन मेजरने या पोस्टला दिलं आहे.

व्हिडिओ 25 डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. शेअर केल्यापासून ते दोन लाखापेक्षा जास्त वेळा पाहिले गेले असून 9 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स आहेत.

ट्विटरवरील कमेंट बॉक्समध्ये एका व्यक्तीने लिहिले की, जेव्हा तुम्ही तुमच्या आईची सेवा करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू येते. वीरांना सलाम”.