VIDEO : आता तुमचा मोबाईल देखील सकाळी वॉश घेणार, जपानने बनवले स्मार्ट फोन सिंक मॉडेल

मोबाईलवर आपण बॅंक व्यवहारापासून ऑफीसची कामे करीत असून तो आपल्याला सातत्याने जवळ बाळगावा लागत आहे. त्यामुळे त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी नविन तंत्र बाजारात आले आहे.

VIDEO : आता तुमचा मोबाईल देखील सकाळी वॉश घेणार, जपानने बनवले स्मार्ट फोन सिंक मॉडेल
japanese technology
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 16, 2023 | 12:40 PM

नवी दिल्ली : कोविडकाळानंतर आपण अधिक काळजी घेत असून प्रत्येक वापराची खाजगी वस्तू निर्जंतुक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कोरोनाकाळात हातांना सॅनिटाईज करण्यापासून भाजीपाला देखील धुण्यासाठी खास लिक्वीड बाजारात मिळण्यास सुरूवात झाली होती. आता तर तुम्ही वापरीत असलेला मोबाईल फोन देखील अनेक जंतूंचा वाहक असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. आपले हाथ सॅनिटाईज करण्याबरोबरच आपल्या सोबत सतत असलेल्या मोबाईल फोनला व्हायरस मुक्त ठेवणे गरजेचे आहे. तर आता मोबाईलच्या शुद्धीकरणासाठी देखील नवीन तंत्र बाजारात आले आहे. चला काय आहे हे नेमके तंत्र आपण माहीती करून घेऊया..

आपला मोबाईल फोन आता स्मार्टफोन बनला आहे. मोबाईलवर आपण बॅंक व्यवहारापासून ऑफीसची कामे करीत असून तो आपल्याला सातत्याने जवळ बाळगावा लागत आहे. तर अशा मोबाईलवर जंतू जमण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे मोबाईलला सॅनिटाईज करण्यासाठी जपानच्या एका मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटने एक असा वॉश बेसिन बनविला आहे, ज्याच्यात आपल्या हातासोबतच आता स्मार्ट फोन मोबाईल देखील वॉश करता येणार आहे. या अत्यंत युनिक अशा जपानी वॉश बेसिनचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या युनिक सेफ सिंकचा व्हीडीओ पाहून युजरने अनेक मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.

TWITTER ट्वीटरवर मासिमो ( Massimo ) नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की वॉश बेसिनमध्ये स्मार्ट फोनला सॅनिटाईज करण्यासाठी खास सिस्टीम बनविली आहे. सिंकच्या फटीत आपला स्मार्टफोन घातल्यानंतर काही सेंकदात तो सॅनिटाईज होऊन बाहेर येताना दिसत आहे. युजरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की जपानमध्ये अनेक मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये स्मार्ट फोनला सॅनिटाईज करण्यासाठी असे खास वॉश बेसिन बसविले आहेत. जपानच्या वोटा (WOTA)   नावाच्या कंपनीने या सिस्टीमला वॉश ( WOSH ) असे नाव दिले आहे. स्मार्टफोनला आपण सारखा स्पर्श करीत असतो. त्याला स्पर्श केल्यानंतर प्रत्येकवेळी हात सॅनिटाईज करणे कठीण असते. त्यापेक्षा स्मार्टफोनलाच सॅनिटाईज करण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.


हा व्हिडीओ दहा लाख लोकांनी पाहीला आहे. सात हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. दहा हजार लोकांनी त्यास रिट्वीट केले आहे. त्यावर मजेदार कमेंट आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की स्मार्टफोन सॅनिटाईज करताना आपला डेटा ओला तर होणार नाही ना.. ! तर एका युजरने म्हटले आहे की ही मशिन चांगली आहे जोपर्यंत आपला फोन यात अडकत नाही !