मराठमोळ्या तात्यांचा गरबा पाहून दयाबेन, शांतीबेनही म्हणेल, बहू सारो छे!

| Updated on: Sep 30, 2022 | 5:44 PM

एक वयोवृद्ध तात्या आपलं चांगलंच लक्ष्य वेधून घेतात. या तात्यांनी मराठमोळी पांढरी टोपी, सदरा आणि पायजमा घातलेला आहे. शिवाय पायात चामड्याची चप्पल आहे.

मराठमोळ्या तात्यांचा गरबा पाहून दयाबेन, शांतीबेनही म्हणेल, बहू सारो छे!
मराठमोठ्या तात्यांचा गरबा डान्स व्हायरल
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात जशी गणपतीची धूम असते, (Navratri Garba Dance) तशीच धूम नवरात्रीत गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये असते. त्यात, नवरात्र म्हटली की, गरबा नाही आला तर नवलच. गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही आता गरबा खेळला जातो. तरुण-तरुणी यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. पण गरबा-दांडिया (Dandiya) फक्त गुजरातेतच चांगला खेळला जातो, असं कुणी सांगितलं? महाराष्ट्रातही तो तितक्याच उत्साहात असतो. असाच एक गरब्याचा व्हिडीओ (Old Man Garba) चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यातील तात्यांचा अंदाज तुम्हांला भुरळ पाडेल.

गरब्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मॉलच्या मध्यभागी अनेक लोक जमलेले दिसतात. हे सर्वजण गरब्यासाठी जमल्याचं इथं स्पष्टपणे जाणवतं. मॉलमध्ये एक गुजराती गाणं सुरु आहे, ज्यावर हे सर्वजण थिरकत आहेत.

मात्र, यामध्ये एक वयोवृद्ध तात्या आपलं चांगलंच लक्ष्य वेधून घेतात. या तात्यांनी मराठमोळी पांढरी टोपी, सदरा आणि पायजमा घातलेला आहे. शिवाय पायात चामड्याची चप्पल आहे. यावरुन त्यांचं महाराष्ट्राची असलेलं नातं स्पष्ट होतं.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ:


हे तात्या अतिशय आनंदात गरबा खेळण्यात मग्न आहे. त्यांच्या गरब्याच्या स्टेप्स कुणा गरबा डान्सरलाही लाजवतील अशा आहेत. त्यांच्या गरबा डान्समुळं इतरही लोक उत्साहित होताना दिसताहेत.

हा व्हिडीओ जुना आहे, मात्र नवरात्रीमुळे पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत. अनेकजण या तात्यांचं कौतुकच करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. 4 हजाराच्या जवळपास या व्हिडीओला लाईक्स आहेत. हेच नाही तर अनेकांनी आपल्या स्टेटसला हा व्हिडीओ ठेवलेला पाहायला मिळत आहे.