
Umoja village in Kenya: आपलं जग हे अत्यंत अनोखं आहे. इथं विविध प्रकारचे, रीतीरिवाज, परंपरा, प्रथा पाळणारे लोक राहतात. जगात काही गावाच्या काही विशिष्ट प्रथा आहेत. काही गावात कपडे न वापरणारे लोक आहेत. तर काही ठिकाणी इतर प्रथा जपणारा समाज राहतो. अशीच एक प्रथा या गावातही आहे. या गावात केवळ महिला राहतात. इथं महिला राज चालतो. इथं पुरुषांना अजिबात प्रवेश नाही. पुरुषही महिलांच्या या प्रथेचा आवर्जून आदर करतात. या गावात ते सुद्धा येत नाही. कोणते आहे हे अनोखे गाव?
अफ्रिकेतील अनोखं गाव
वृत्तसंस्था Reuters ने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार अफ्रिकेतील केनिया या देशात हे अनोखं गाव आहे. उमेजा असं या गावाचं नाव आहे. हे गाव इतर गावांप्रमाणेच आहे. येथे मातीत गाईचं शेण कालवून घर लिंपल्या जातं. घर आतून बाहेरुन सारवलं जातं. इथं अनेक झाडं आहेत. पण या गावात तुम्हाला पुरुष दृष्टीला पडत नाही. या गावात केवळ महिला राहतात. पुरुषांना या गावात प्रवेश बंदी आहे. इथं केवळ महिला राहतात. जवळपास 30 वर्षांपूर्वी हे गाव वसवल्या गेलं. इथं संबुरु समाजाच्या महिला राहतात. सुरक्षेसाठी या महिला या गावात राहतात. घरगुती हिंसा, बाल विवाह, वा इतर काही कारणांमुळे अत्याचार झालेल्या महिलांनी हे गाव तयार केलं आहे. त्यामुळं इथं पुरुषांना अजिबात थारा नाही.
या गावात महिला आणि मुलांचं वास्तव्य
कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांनी हे गाव वसवलं आहे. अनेक अपमान पचवून त्या इथं आल्या आहेत. इथं त्यांना स्वातंत्र्य आहे. इथं कुणाची भीती नाही. कुणाचा धाक नाही. इथं अशात काही नवीन महिला दाखल झाल्या आहेत. घर, कुटुंब सोडून त्या या गावाच्या सदस्य झाल्या आहेत. या गावात घरातून काढून दिलेल्या, पती, आई-वडील यांच्यावर नाराज असलेल्या अथवा स्वातंत्र्य हवं असलेल्या, लग्न नको असलेल्या अनेक महिला वास्तव्यास आलेल्या आहे. तर काही जणी मजबूरी म्हणून या गावाच्या आश्रयाला आल्या आहेत. उमेजा हेच त्यांचं माहेर आणि सासरं आहे.
30 वर्षांपूर्वी वसले गाव
30 वर्षांपूर्वी रेबेका लोलोसॉली या महिलेने, महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला. ती सुद्धा पीडितच होती. पुरुष प्रधान समाजाला तिने विरोध केला. तिने इतर 15 महिलांना घेऊन हे गाव तयार केले. आता सध्या या गावात 40 अधिक कुटुंब राहतात. तर या महिला गुरंढोरं चारण्याचा, दूध विक्री करण्याचा आणि इतर व्यवसाय करतात. इथं आजूबाजूच्या गावातील पुरुष या महिलांना त्रास देतात. रात्री अपरात्री त्यांची जनावरं पळवतात. या महिला त्यांचा हिंमतीनं सामना करतात.