राजेशाही थाटातील लग्न मंडपात जेव्हा बैल घुसतो, पाहुण्यांची पळापळ पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही

लग्नमंडपात जेव्हा आमंत्रण न दिलेला पाहुणा घुसतो. तेव्हा काय होतं. पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ.

राजेशाही थाटातील लग्न मंडपात जेव्हा बैल घुसतो, पाहुण्यांची पळापळ पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही
| Updated on: Dec 15, 2022 | 10:41 PM

Royal wedding Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ एका रॉयल लग्नातील आहे. लग्नादरम्यान कधी काय होईल हे सांगतो येत नाही. अशाच एका लग्नात जेव्हा बैल घुसतो तेव्हा पाहुण्यांची कशी पळापळ होते. हे पाहून तुम्हाला ही हसू आवरणार आहे. लग्नात हा न बोलवलेला पाहून जेव्हा एन्ट्री करतो. तेव्हा काय परिस्थिती होते.

या पाहुण्याला ना वधू पक्षाकडून निमंत्रण होतं ना वर पक्षाकडून. तरी हा पाहुणा लग्नमंडपात घुसला. ज्याला पाहिल्यानंतर उपस्थित सगळ्यांचीच धावपळ झाली. या बैलाच्या येण्याने लग्नमंडपात एकच दहशत निर्माण झाली. लग्नात आपण देखील जेवणावर ताव मारण्यासाठी जातो. हा पाहुणा देखील जेवणाच्या शोधात या लग्नात आला होता. पण त्याला पाहून अनेक जणांची भूकच पळाली आणि त्यांनी मंडपातून काढता पाय घेतला.

आता लग्नात कोणीतरी हिरोगिरी करणारा असतोच. या लग्नात देखील एकाने हिरोगिरी करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा बैल त्याच्याच मागे धावला तेव्हा तो देखील जीव घेऊन पळाला. या दरम्यान तो खाली पडतो. पण कसाबसा तो यातून आपली सूटका करुन घेतो. पण हा बैल नंतर लग्न मंडपातून हळूच काढता पाय देखील घेतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही देखील हसू आवरु शकणार नाही.