लाटणं विसराच राव, परफेक्ट गोलगट्टम पुरी अशी करा तयार; जुगाड म्हणजे जुगाड म्हणजे जुगाडच, Video व्हायरल

सणासुदीला किंवा पाहुणे आल्यास लाटण्याशिवाय गोल पुरी बनवण्याचा एक भन्नाट व्हायरल हॅक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. पोळपाट-लाटणं न वापरता, फक्त एका छोट्या भांड्याच्या तळाचा वापर करून काही मिनिटांत परफेक्ट गोल पुऱ्या तयार करता येतात. हा सोपा किचन जुगाड गृहिणींसाठी आणि स्वयंपाकप्रेमींसाठी वेळ व श्रम वाचवणारा ठरला आहे.

लाटणं विसराच राव, परफेक्ट गोलगट्टम पुरी अशी करा तयार; जुगाड म्हणजे जुगाड म्हणजे जुगाडच, Video व्हायरल
हंडी मॅजिक पाहून लोकं थक्क
| Updated on: Feb 20, 2026 | 7:38 PM

सणासुदीला किंवा घरी पाहुणे आल्यावर पाणी पाहुणचार म्हणून पुऱ्यांचा बेत आखतो. स्वयंपाकघरात बराच वेळ उभं राहून पोळपाट-लाटणं हाताळावं लागतं आणि हातही थकून जातात. पण इंस्टाग्रामवरी एका पेजवर गोलगट्टम पुरी बनवण्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या एका व्हिडिओने महिलांची आणि कुकिंगची आवड असणाऱ्यांची ही अडचणच दूर केली आहे. या भन्नाट किचन हॅकमुळे पुरी बनवणं आता अधिक सोपं आणि जलद होऊ शकतं. खरंच, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही तोंडून आपोआप शब्द निघतील अरे, हा उपाय आधी का नाही कळला?

कसे काम करतो हा देशी हॅक?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लाटणं न वापरता काही मिनिटांत गोल-गोल पुरी तयार करताना दिसतो. सर्वात आधी तो कणकेच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करतो. यानंतर एका छोट्या हांड्याच्या तळाला थोडंसं तेल लावतो आणि त्या तळाखाली कणकेची लोई ठेवून हलकं दाबतो. काही सेकंदांतच ती लोई अगदी परफेक्ट गोल आकारात पुरीसारखी तयार होते. ना पोळपाट-लाटणं, ना जास्त मेहनत लागत. हा सोपा आणि भन्नाट उपाय पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

इंटरनेटवर धुमाकूळ

या व्हिडिओची लोकप्रियता किती अफाट आहे, याचा अंदाज यावरूनच येतो की, आतापर्यंत 5 कोटींपेक्षा अधिक लोकांनी तो पाहिला आहे. इतकंच नव्हे तर 22 लाखांहून जास्त जणांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. नेटिझन्स या भन्नाट कल्पनेचं कौतुक करत असून, हा उपाय म्हणजे ‘स्मार्ट वर्क’चं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणत आहेत. कमी मेहनतीत जास्त परिणाम कसा मिळवायचा, हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसतं.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?

या व्हिडिओखालील कमेंट्स पाहिल्या तर लोक या आयडियावर फिदा झाल्याचं दिसतं. अनेकांनी हा देशी उपाय भन्नाट असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं, “अरे वा ही ट्रिक आधी कळली असती तर किती सोपं झालं असतं.” दुसऱ्याने मजेत म्हटलं, “हे पाहिल्यावर आई तर नक्की खुश होणार” तर आणखी एकाने कमेंट केली, “जे एकटे राहतात त्यांच्यासाठी हा तर जबरदस्त उपाय आहे.”