अबब..! 30 फुटांहूनही अधिक उंचीवरून उडी? 82 लांखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलाय ‘हा’ Video

सोशल मीडिया(Social Media)वर दररोज स्टंट(Stunt)शी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक मुलगी सुमारे 30 फूट उंचीवरून उडी मारते आणि स्टंट दाखवते.

अबब..! 30 फुटांहूनही अधिक उंचीवरून उडी? 82 लांखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलाय हा Video
स्टंट करताना मुलगी
| Updated on: Jan 27, 2022 | 3:33 PM

Girl stunt video : सोशल मीडिया(Social Media)वर दररोज स्टंट(Stunt)शी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येतं. कारण ते स्टंट योग्य पद्धतीनं केलेले नसतात. तर काही स्टंटचे व्हिडिओ इतके अप्रतिम असतात, तुम्हाला ते पाहून आश्चर्य वाटेल. मग तुम्हाला ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक मुलगी सुमारे 30 फूट उंचीवरून उडी मारते आणि असा स्टंट दाखवते, की तुमच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढतील. आतापर्यंत 8.2 दशलक्ष लोकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे. हा व्हिडिओ एका कार्यक्रमादरम्यान शूट करण्यात आल्याचं दिसत आहे. काही सेकंदांचा हा स्टंट व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

30 फूट उंचीवर हवेत उडी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पांढऱ्या कपड्यांमध्ये काही कलाकार स्टेजच्या एका टोकाला झुल्यावर आहेत. यानंतर, अचानक वेगानं डौलत, एक मुलगी सुमारे 30 फूट उंचीवर हवेत उडी मारते. हे दृश्य अक्षरश: अंगावर काटा आणतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्टेजच्या दुसऱ्या भागात वरपासून खालपर्यंत पांढरे कापड बांधले आहे. मुलगी उडी मारून या कपड्यावर उतरते. त्यानंतर घसरत खाली येतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर adrenalineblast नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 11 जानेवारीला शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यूझर्स या व्हिडिओचा मनमुराद आनंद घेत आहेत. आतापर्यंत 82 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केलं आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘हवा टाइट झाली’

यावर एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की स्टंट बघून माझी हवा टाइट झाली. दुसऱ्या यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की ‘स्टंट का आखिरी हिस्सा बड़ा जोरदार था.’ दुसऱ्या यूझरनं म्हटलं, की तोही असा स्टंट प्रयत्न करू इच्छितो. मात्र त्यावेळी कोणीही प्रेक्षक असता कामा नये.

Video : चक्क स्पायडर मॅन खेळतोय Squid Game, तोच जीवघेणा खेळ आणि पाठलाग करणारा बंदुकधारी!

‘ही शर्यत रे अपुली…’ अशी शर्यत तुम्ही कधीच पाहिली नसेल, कुत्र्यांचा मनोरंजक Video पाहाच

चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी