Viral Video: बघितल्यावर कळून येणार की हे नेमकं काय आहे! आनंद महिंद्रा सुद्धा झाले अचंबित!
या व्हिडिओत एक शिडी आहे, जिना! यात जिन्यासारखा पॅटर्न (Pattern) पाहायला मिळतोय, पण हे डिझाइन एका भिंतीला लागूनच आहे. पहिलं तर ही शिडी दिसतच नाही पण दिसली तर ही शिडी कुणाला वापरायची असेल तर वापरावी असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल.

इंटरनेटवर (Internet) रोज खूप व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही व्हिडिओ नावीन्यपूर्ण आहेत. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ट्विटरवर नेहमीच काहीतरी शेअर करत असतात. इतकंच नाही तर ते आपल्या चाहत्यांना प्रतिसादही देतात. जर तुम्ही त्यांना फॉलो केलंत, तर तुम्हाला त्यांच्या विनोदबुद्धी बद्दलही कळेल. यावेळीही त्यांनी एक अतिशय रंजक गोष्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. या व्हिडिओत एक शिडी आहे, जिना! यात जिन्यासारखा पॅटर्न (Pattern) पाहायला मिळतोय, पण हे डिझाइन एका भिंतीला लागूनच आहे. पहिलं तर ही शिडी दिसतच नाही पण दिसली तर ही शिडी कुणाला वापरायची असेल तर वापरावी असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा प्रश्न तुमच्या मेंदूतही आला असेल तर गोंधळून जाऊ नका आणि सर्वात आधी हा व्हायरल व्हिडिओ पाहा…
साधी पण अभिनव
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे विलक्षण आहे. इतका साधा पण कल्पक. डी-क्लटरींग जागेव्यतिरिक्त, हा जिना प्रत्यक्षात बाह्य भिंतीत एक आकर्षक सौंदर्य घटक जोडतो. स्कँडिनेव्हियन डिझायनर्सना हेवा वाटावा!! (माझ्या #whatsappwonderbox ते कुठून आले आहे हे मला माहित नाही). लोकांनाही हा व्हिडिओ पसंत पडत आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर काहीच सेकंदात व्हिडिओला 46 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि 5 हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक (सोशल मीडिया यूजर्स) आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. खरं तर या जुगाडासाठी त्या माणसाने खूप मेंदू चालवला असावा असं लोकांचं म्हणणं आहे.