
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक मॉडेल फोटोशूट करताना दिसत आहे. पण समुद्र किनारी फोटोशूट करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे… फोटोशूट करत असताना समुद्र किनारी मोठी लाट आली आणि होत्याचं नव्हतं झालं… मोठ्या लाटेत मॉडेल हिचे प्राण गेले नाहीत, पण ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे… तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देखली मिळत आहे… तर सोशल मीडियावर मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मॉडेलचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ अत्यंत भयानक आहे… कारण, फोटोशूटसाठी पोज देणाऱ्या मॉडेल अचानक एका मोठ्या लाटेच्या जाळ्यात अडकली. कारण जवळपास धोकादायक कडे आणि खडकांची रचना होती. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मॉडेलच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली.
न्यू यॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इजिप्तमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एक चिनी पर्यटक मॉडेल फोटोशूट करत होती. फोटोशूट करत असताना मोठी लाट येते. या लाटेत महिला वाहून जात नाही, पण ती थोडक्यात बचावली.
Mısır’ın Akdeniz kıyısındaki Mersa Matruh kentinde bulunan Matrouh Eye adlı doğal güzellik alanını ziyaret eden kadın fotoğraf uğruna canından oluyordu. Çinli turist kayalık bir uçurumun üzerinde oturduğu sırada gelen dev dalganın çarpmasıyla dengesini kaybederek denize… pic.twitter.com/wydXSh8hBA
— Haberler.com (@Haberler) December 22, 2025
मार्सा मात्रौहमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या मातरोह आय येथे फिरण्यासाठी मॉडेल आली होती. जिथे लोक प्रभावी खडक रचना आणि नेत्रदीपक लाटा पाहण्यासाठी येतात. येथे लाटा नकळत मोठ्या खडकांवर धडकतात… हेच दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात.
फोटोशूटसाठी पोज देत होती चीनी मॉडेल
व्हिडिओमध्ये, महिला नारंगी रंगाचा ड्रेस घालून करून एका उंच कडा असलेल्या खडकावर पोज देताना दिसत आहे. अचानक, उंच लाटा येताल आणि ज्या मोठ्या खडकाळ खड्ड्यात मॉडेल पोज देत होती तिथे आदळतात. पण त्या ठिकाणी दोरी उपलब्ध असल्याने मोठी दुर्घटना टळते…