Viral: “एकटेच चालल्यात एकटेच चालल्यात,आमच्या सगळ्याला थोडं बाहेर तर न्ह्यावं का नई?” मामाकडे पप्पांची तक्रार

| Updated on: Jul 18, 2022 | 3:13 PM

Viral Video: तक्रारीची सुरुवातच अशी होते, "निस्ते ह्यानीच चाललेत बाहेर खायला. कधी मला मम्मीला, बाळाला पण न्यावं का नई? एकटेच चालल्यात एकटेच चालल्यात... आमच्या सगळ्याला थोडं बाहेर तर न्ह्यावं का नई?

Viral: एकटेच चालल्यात एकटेच चालल्यात,आमच्या सगळ्याला थोडं बाहेर तर न्ह्यावं का नई? मामाकडे पप्पांची तक्रार
Viral Video Girl Complaining to mama
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

लहान मुलं नेहमी घरात काय चालू असतं हे बघत असतात. त्यांचं खूप लक्ष असतं. म्हणून जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा घरातले लोकं (Family Members) विचार करून वागतात बोलतात. आता थोडं वेगळं चित्र आहे पण…आत्ताची मुलं अजून पुढची आहेत. आता हे घरी कोण असतं कधी असतं कोण कुठे असतं या सगळ्याकडे लक्ष ठेऊन असतात. एका छोट्या मुलीचे वडील सारखेच बाहेर जेवायला जातायत. ती मुलगी त्या त्यांच्या सारख्या बाहेर जाऊन जेवायला इतकी वैतागली आहे की ती वैतागून मामाकडे तक्रार करतीये. शेवटी तर ती पप्पा खोटं (Lie) बोलून जातायत रोजच जेवायला बाहेर असं पण सांगतीये. ती सांगते इतक्या मजेशीररित्या की तिचे हावभाव (Expressions) बघून प्रश्न पडतोय पोरगी शिकली कुठून? तिच्या आईचं माहित नाही पण ती नक्कीच पप्पांच्या अशा वागण्याला कंटाळली आहे.

व्हिडीओ:

कधी मला मम्मीला, बाळाला पण न्यावं का नई?

तक्रारीची सुरुवातच अशी होते, “निस्ते ह्यानीच चाललेत बाहेर खायला. कधी मला मम्मीला, बाळाला पण न्यावं का नई? एकटेच चालल्यात एकटेच चालल्यात… आमच्या सगळ्याला थोडं बाहेर तर न्ह्यावं का नई? निस्ते हेच चालल्यात…मा… खोटं बोलून जातायत!” ही वाक्य आहेत एका लहानशा मुलीची. ही छोटी मुलगी आपल्या मामाकडे आपल्या वडिलांची तक्रार करतीये. तिचे पप्पा रोज बाहेर जेवण करतात ते जाताना तिच्या आईला आणि तिला हॉटेल मध्ये घेऊन जात नाहीत. मुलगी म्हणते, पप्पांना घरी जेवायला आवडत नाही. बाहेर जेवायला गेले की गाड्या बघता बघता जेवता येतं तेच ते घरी असले की फोनमध्ये बघत बसतात. बोलता बोलता ही मुलगी मध्येच मामाला म्हणते,” काय मामा खरंय की नाही?”. तिच्या या मजेशीर वाक्यांमुळे हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय की आता तरी तिच्या तक्रारीची तिच्या वडिलांना दखल घ्यावी लागणारच आहे.