AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: अय्यो! पोरीनं विचारलं, “दिवाळीच्या सुट्टीत मला तुम्ही गुवाहाटीला फिरायला न्याल ना? प्रॉमिस??”

Eknath Shinde: अहो चिमुरडी मुख्यमंत्र्यांना म्हणाली," तुम्ही पुराच्या पाण्यात सुद्धा वाचवायला आले होते तेव्हा...मी जर अशी मदत केली तर मला पण मुख्यमंत्री होता येईल?" हे ऐकून मुख्यमंत्री सुद्धा हसले. बरं ती एवढ्यावर थांबली नाही

Viral Video: अय्यो! पोरीनं विचारलं, दिवाळीच्या सुट्टीत मला तुम्ही गुवाहाटीला फिरायला न्याल ना? प्रॉमिस??
Eknath shinde viralImage Credit source: TV9 marathi
| Updated on: Jul 18, 2022 | 1:31 PM
Share

Eknath Shinde Viral: “शेवटी ना मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं होतं. दिवाळीच्या सुट्टीत मला तुम्ही गुवाहाटीला फिरायला न्याल ना?” नाही नाही. हे प्रॉमिस कुठल्या आमदाराने नाही मागितलंय. हे प्रॉमिस चक्क एका छोट्याशा मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) मागितलं आहे. झाडी, डोंगार, हाटील आणि गुवाहाटी (Guwahati) गेल्या काही दिवसात लई फेमस झालं हो! इतकं फेमस झालं की आता लहान पोरांना पण गुवाहाटीला जायची इच्छा होतीये. या चिमुरडीने तर मुख्यमंत्र्यांनाच प्रॉमिस मागितलंय! चिमुरडीची  ही मागणी ऐकून एकच हशा पिकला. झालं असं की एक मुलगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला आली. या छोट्याशा भेटीत या हुशार पोरीनं आपली मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली तेही न घाबरता! अहो चिमुरडी मुख्यमंत्र्यांना म्हणाली,” तुम्ही पुराच्या पाण्यात सुद्धा वाचवायला आले होते तेव्हा…मी जर अशी मदत केली तर मला पण मुख्यमंत्री होता येईल?” हे ऐकून मुख्यमंत्री सुद्धा हसले. बरं ती एवढ्यावर थांबली नाही ती म्हणाली, मला ना आधी मोदीजी आवडायचे पण आता धर्मवीर (Dharmaveer) पाहिल्यापासून मला तुम्ही आवडता!” असंही ती म्हणाली.

व्हिडीओ

मॅडमचे प्रश्न काही संपत नव्हते…

अन्नदा नावाची ही चिमुरडी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कुल इथं शिकते. चिमुरडीचे प्रश्न काही थांबत नव्हते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते.गुवाहाटीचं ऐकल्यावर एकनाथ शिंदे, “झालं एवढंच राहिलं होतं” असे हावभाव करत हसले आणि पुढे म्हणाले, “चालेल कुठे? कामथ्या देवीचं दर्शन घ्यायचं ना?”. मुख्यमंत्र्यांना चिमुरडीचं फार कौतुक वाटलं. अन्नदा नावाच्या या मुलीने आपली चांगलीच छाप सोडली. ती जे जे विचारत गेली तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पण मॅडमचे प्रश्न काही संपत नव्हते. शेवटी तिने एकदम सहज तुम्ही मला दिवाळीच्या सुट्टीत गुवाहाटीला नेणार का? असं विचारून सगळ्यांनाच हसवलं. आता हा प्रश्न खरं तर महाराष्ट्रात कुणी विचारायची हिंमत करणार नाही मुख्यमंत्र्यांना पण पोरीनं करून दाखवलं, विचारून दाखवलं, “गुवाहाटीला नेणार का? प्रॉमिस??”

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.