क्या बात है! मालकीण म्हणेल तशी म्हैस नाचू लागते! कमाले हा व्हिडीओ…

प्राणी सुद्धा फारमजेशीर मजेशीर असतात. त्यांना सुद्धा माणसाच्या मनातलं कळतं की काय असा प्रश्न पडतो कधी कधी. कुत्रं, मांजर, म्हैस सगळेच पाळीव प्राणी मालकाशी फार प्रामाणिक (Loyal) आणि जवळ असतात.

क्या बात है! मालकीण म्हणेल तशी म्हैस नाचू लागते! कमाले हा व्हिडीओ...
Buffalo dancing
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 19, 2022 | 4:05 PM

लोकांचं प्राण्यांशी फार अनोखं नातं (Relationship) आहे. आता तर हळूहळू माणसाच्या आयुष्यातल्या माणसाची जागा “प्राणी” घेऊ लागलाय असं म्हणायला हरकत नाही. प्राण्यांचे (Animals) कसले हट्ट, कसल्या मागण्यापण नसतात. प्राणी सुद्धा फारमजेशीर मजेशीर असतात. त्यांना सुद्धा माणसाच्या मनातलं कळतं की काय असा प्रश्न पडतो कधी कधी. कुत्रं, मांजर, म्हैस सगळेच पाळीव प्राणी मालकाशी फार प्रामाणिक (Loyal) आणि जवळ असतात. हा व्हिडीओ बघा.

व्हिडिओ

सोशल मीडियावर एका म्हशीच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय, ज्यात आपल्या मालकिणीच्या सांगण्यावरून म्हैस नाचतीये.

ही गोठ्यातली म्हैस आपल्या मालकिणीच्या सांगण्यावरून अगदी आनंदाने नाचताना दिसतीये. हे दृश्य इतकं सुंदर आहे. जसं मालकीण म्हणेल, “नाच” तशी ही म्हैस नाचतीये.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोठ्यातल्या या म्हशीने शाल पांघरलीये. या म्हशीला तिची मालकीण तिला चारा द्यायला येते.

दुसऱ्याच क्षणी ही मालकीण ‘ढोलक बजडा’ नावाचं गाणं गुणगुणत नाचायला लागते. मालकीण म्हशीला सुद्धा नाचायला सांगते, म्हैस सुद्धा इतकी छान नाचते की बघणारा बघतच राहील.