Rare Vulture Video: निसर्गाची किमयाच न्यारी! दुर्मिळ गिधाड सापडलं, सेल्फी काढण्यासाठी गर्दीच गर्दी

या गिधाडाला स्थानिकांनी पकडलं, मात्र यानंतर लोकांनी ते वनविभागाच्या ताब्यात दिलं. या गिधाडाची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Rare Vulture Video: निसर्गाची किमयाच न्यारी! दुर्मिळ गिधाड सापडलं, सेल्फी काढण्यासाठी गर्दीच गर्दी
Himalayan Griffon
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 10, 2023 | 10:14 AM

कानपूर: देशातील गिधाडांच्या बहुतांश प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र रविवारी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक दुर्मिळ पांढरे गिधाड आढळून आले त्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या गिधाडाला स्थानिकांनी पकडलं, मात्र यानंतर लोकांनी ते वनविभागाच्या ताब्यात दिलं. या गिधाडाची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्मिळ हिमालयीन ग्रिफॉन गिधाडाला कानपूरच्या कर्नलगंजच्या ईदगाह स्मशानभूमीत पकडण्यात आले होते. सुमारे आठवडाभरापासून हे गिधाड या भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. या गिधाडाचे पंख 5-5 फुटांचे आहेत. हे गिधाड पाहताच लोकांची त्यासोबत फोटो काढण्याची स्पर्धा लागली.

या गिधाडाला कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या भागात हे गिधाड कुठून आले, याबद्दल माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका स्थानिकाने सांगितले की, “हे गिधाड आठवडाभर इथेच होते. आम्ही ते पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. शेवटी, जेव्हा ते खाली आले, तेव्हा आम्ही ते पकडले.”

rare vulture found in kanpur

“गिधाड पकडल्यानंतर वनविभागाला माहिती देऊन गिधाड त्यांच्या ताब्यात देण्यात आले’ असे त्यांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयात या गिधाडाच्या प्रत्येक क्रियेवर नजर ठेवली जात आहे. कानपूरमध्ये हे असं गिधाड नसून अशा दोन गिधाडांची जोडी असल्याचंही सांगण्यात आलं. पण एक गिधाड उडून गेलं आणि एकाला पकडण्यात आलं.

या गिधाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये स्थानिक लोक या पक्ष्याला पकडून आपले पंख पसरताना दिसत आहेत. या दुर्मिळ पक्ष्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.