‘मन वेडावलं भौ, पुन्हा लग्न करावसं वाटतंय’, लग्नात पोट्ट्यांनी दिलं असं गिफ्ट की तुम्हाला पण असंच वाटणार,Viral Video पाहाच

wedding ceremony : लग्नाची गोष्टच निराळी असते राव. मित्र तर या लग्नसोहळ्यात चार चांद लावतात. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला ही वाटेल की चला पुन्हा एकदा लग्न करुयात. अर्थात जोडी तिची असायला हवी नाही का?

मन वेडावलं भौ, पुन्हा लग्न करावसं वाटतंय, लग्नात पोट्ट्यांनी दिलं असं गिफ्ट की तुम्हाला पण असंच वाटणार,Viral Video पाहाच
| Updated on: Aug 31, 2025 | 2:56 PM

लग्न सोहळ्यात मित्र चार चांद लावतात. मित्र हे लग्नात धमाल करतात. त्यांचा डान्स, मदत आणि गिफ्ट हे तर खास आठवण असते. अचानक फ्लॅश बॅकमध्ये गेल्यावर अथवा लग्नाचा फोटो अल्बम काढल्यावर या आठवणी मनात रूंजी घालतात. काही मित्र तर एकदम क्रिएटीव्ह असतात. आपल्याच मित्राची खेचायला कमी करत नाहीत. अर्थात ही तात्पुरती गंमत असते. त्यामुळे चांगलाच हश्शा पिकतो. वातावरणातील गंभीरता, तणाव झटक्यात नाहीसा होता. त्यामुळे असे काही बदमाश मित्र आयुष्यात असायलाच हवेत.

मित्रांच्या कृतीने हसून हसून पुरेवाट

या व्हिडिओत वधू आणि वर हे सोफ्यावर बसलेले दिसतात. तर दुसरीकडून एक एक मित्र त्यांना भेटायला येतात. अगोदर एक मित्र छोटा प्लास्टिकचा स्टूल आणतो. तो मन डोले मेरा तन डोले या गाण्यावर नाचतो. त्याच्या या नखरेल डान्सवर वधूला तिचे हसू काही आवरता येत नाही. तर नवरदेव तर खळखळून हसतो. इतर मित्रही खालून त्याला दाद देतात. हा व्हिडिओ एकदम मनोरंजन करतो.

त्यानंतर अजून एक मुलगा एक टब घेऊन येतो. तोही डान्स करतो. दोघांनाही तो हे गिफ्ट देतो. त्यानंतर एक मुलगा मग्गा आणतो. अशा संसार उपयोगी एक एक वस्तू आणल्या जातात. कोणी झाडू आणते तर कोणी अजून काही, एक पठ्ठ्या तर थेट दुधाची कॅन घेऊन येतो. या सर्व अतरंगी गिफ्टमुळे तिथले वातावरण खळखळून हस्यात बदलते. प्रत्येकाचा डान्सपाहून अनेकांचा मनावरील ताबा सुटतो आणि ते त्यावर जोरदार टाळ्या वाजवतात. हसून दाद देतात.

पुन्हा लग्न करावसं वाटतंय

लग्नात असे मित्र असतील तर ते लग्न कायमचं आठवणीत राहते. या मित्रांनी केलेल्या अप्रतिम डान्सने तर माहौल तयार केला. ते गाण्याच्या बीट्सवर हलका फुलका डान्स करतात. पण ऱ्हीदम आणि बीट्स चपखल स्टेप्स करतात. त्यावेळी टाळ्यांची दाद मिळते. हा व्हिडिओ रामवीर आझाद याने त्याच्या खात्यावरून शेअर केला आहे. त्यावर लाईक्स आणि कमेंट्सा पाऊस पडला आहे. त्यात एकाने लिहिलं आहे, राव असा माहौल असेल तर पुन्हा लग्न करावसं वाटतंय.