ChatGPT : अत्यंत धक्कादायक! चॅटजीपीटीमुळे त्याने केला आईचा खून? मग स्वत:लाही संपवले? अमेरिकेतील थरार, सत्य काय?
ChatGPT and Murder in America : अमेरिकेतून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. स्टीन एरिक सोएलबर्ग आणि त्याची आई सुझान एबर्सन ॲडम्स हे दोघेही 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या आलिशान घरात मृतावस्थेत सापडले. पण त्यामागील कारण एकदम धक्कादायक आहे.

अमेरिकेत सध्या एका हत्याप्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. स्टीन एरिक सोएलबर्ग आणि त्याची आई सुझान एबर्सन ॲडम्स हे दोघेही 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या आलिशान घरात मृतावस्थेत सापडले. त्यामागील सत्य अनेकांना हादरवणारे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट चॅटजीपीटीशी झालेल्या संवादातून भ्रमित होऊन मुलाने अगोदर आईची हत्या केली आणि नंतर स्वतःलाही संपवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा मुलगा याहूचा माजी मॅनेजर असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेतील कनेक्टिकट येथे ही घटना घडली.
काय आहे कारण?
या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आपली आई ही आपल्यावर पाळत ठेवत आहे. हेरगिरी करत आहे, असे स्टीन एरिक सोएलबर्ग याला सारखं वाटत होतं. ती सायकेडेलिक औषध देऊन त्याच्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती त्याला सारखी वाटत होती. या भीतीमुळे त्याने हा डाव आईवर उलटवल्याचा आरोप समोर येत आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये याविषयीचे एक वृत्त समोर आले आहे. त्यानुसार, ओपनएआयने विकसीत केलेल्या चॅटबॉटमध्ये याविषयीचा मोठा दावा समोर आला आहे. त्यानुसार, सोएलबर्ग यांच्यावर हल्ल्याच्या स्टीन एरिक हा प्रयत्नात होता. त्याने आईला मारण्याचा प्रयत्न केला. तो सारखा एरिक तू वेडा नाहीस असे अनेकदा म्हटले आहे.
स्टीन एरिक हा 56 वर्षांचा होता. तो टेक उद्योगातील एक अनुभवी तज्ज्ञ होता. त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती. तो आणि त्याची आई 5 ऑगस्ट रोजी मृतावस्थेत आढळले होते. हे दोघेही 2.7 दशलक्ष डॉलर्सच्या डच वसाहत शैलीच्या एका टुमदार बंगल्यात राहत होते. चॅटबॉट चॅटजीपीटीशी झालेल्या संवादातून भ्रमित होऊन मुलाने अगोदर आईची हत्या केली आणि नंतर स्वतःलाही संपवल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अमेरिकन समाज माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तो अखेरचा मॅसेज काय?
आपण दुसऱ्या आयुष्यात आणि दुसऱ्या ठिकाणी एकत्र राहू आणि पुन्हा जुळवून घेण्याचा मार्ग शोधू. तू माझा कायमचा मित्र होणार आहेस. तुझ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही सदैव, असा मॅसेज स्टीन एरिकने चॅटबॉटसाठी लिहिला आहे. त्यावरून त्याने अगोदर आईची हत्या केली आणि नंतर स्वतःला संपवले असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे चॅटजीपीटी वापर करण्यासंदर्भातही मोठे प्रश्न उपस्थित होते आहेत. या घटनेची समाज माध्यमांमध्ये सध्या चर्चा आहे.
