#Shweta_Your_Mic_Is_On: झूम मीटिंगमध्ये श्वेताचं फुल्ल गॉसिप, फ्रेंडचं अफेअर, सेक्स अॅडिक्ट, पाहा व्हिडीओ

| Updated on: Feb 19, 2021 | 1:50 PM

झूम क्लास सुरु असताना माईकऐवजी तिने स्पीकर ऑफ केला असावा आणि तिच्या चहाटळ गप्पा सुरु झाल्या. (What is Shweta Your Mic is on )

#Shweta_Your_Mic_Is_On: झूम मीटिंगमध्ये श्वेताचं फुल्ल गॉसिप, फ्रेंडचं अफेअर, सेक्स अॅडिक्ट, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : श्वेता नावाच्या तरुणीने झूम कॉलमध्ये केलेलं गॉसिप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या फ्रेंडचं अफेअर, त्याची सेक्स अॅडिक्ट मैत्रीण यांच्याविषयी तिने केलेले गौप्यस्फोट तमाम नेटिझन्स चवीने चघळत आहेत. त्यामुळे #Shweta_Your_Mic_is_on (श्वेता युअर माईक इज ऑन) हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्डिंगमध्ये आहे. (What is Shweta Your Mic is on Viral Zoom Call trending on Social Media)

पाहा व्हायरल व्हिडीओ :

काय आहे हा व्हिडीओ?

सोशल मीडियावर सध्या एका झूम क्लासची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये श्वेता नावाची तरुणी आपल्या सेक्स-अॅडिक्ट मित्राविषयी तिच्या मैत्रीणीला सांगत आहे. झूम क्लास सुरु असताना माईकऐवजी तिने स्पीकर ऑफ केला असावा आणि तिच्या चहाटळ गप्पा सुरु झाल्या.

श्वेताच्या गप्पा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला झूम क्लासमधील मित्रांना हसू आवरेना. ‘त्या मुलाने मला फोन करुन सांगितलं की तो आपल्या गर्लफ्रेण्डबद्दल खूप पझेसिव्ह आहे. म्हणजे त्याला मला सुचवायचं होतं. ’ असं म्हणत तिने एका तरुणाची स्टोरी सांगायला सुरुवात केली. त्यानंतर पहिली हाक आली.. ‘श्वेता… ’ त्यानंतर श्वेताच्या नावाने क्लासमधील मुलांनी शंख करायला सुरुवात केली.. श्वेता तुझा माईक ऑन आहे, श्वेता माईक बंद कर

गॉसिप करण्यात रमलेल्या श्वेताचं ना झूम क्लासकडे लक्ष होतं, ना मित्रांच्या हाका-आरोळ्यांकडे. ‘तो मला सांगत होता, की ती मुलगी मला फक्त वापरत होती. मला हे माहितही नव्हतं. मी तिच्या मागे वेडा झालो होतो. पण ते सेक्स अॅडिक्ट होती. तिच्याबद्दल आकर्षण होतं. कसं सांगू मी तुला… तिने मला अशी सवय लावली, की आम्ही प्रत्येक भेटीत करायचो. राधिका, कोणी मुलगा आपली गुपितं अशी मित्रांना सांगत नाही. पण त्याने एक-एक सिक्रेट सांगितलं. त्याने आपल्या स्वतःच्या बेस्ट फ्रेण्डला या गोष्टी सांगितल्या नाहीत, त्या मला सांगितल्या.’ असं श्वेता राधिकाला सांगताना ऐकायला मिळतं. त्यावर एका तरुणाची कमेंट म्हणजे काळजी करु नकोस, आता १११ जणांना हे कळलंय. (What is Shweta Your Mic is on Viral Zoom Call trending on Social Media)

संबंधित बातम्या :

VIDEO : गुगल मिटींग सुरु आणि बायकोला किस करण्याचा मोह, कॅमेऱ्यात कैद ‘तो’ क्षण

VIDEO : पार्टीला ‘पावरी’ म्हणणारी पाकिस्तानी तरुणी प्रचंड ट्रोल, ‘PIB फॅक्ट चेक’चाही मौका पाहून चौका!

(What is Shweta Your Mic is on Viral Zoom Call trending on Social Media)