#Shwetayourmicison : माईक ऑन ठेवून ‘श्वेता’च्या चहाटळ गप्पा, Viral Zoom Call नेमका आहे तरी काय?

सोशल मीडियावर सध्या एका झूम क्लासची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये श्वेता नावाची तरुणी आपल्या सेक्स-अॅडिक्ट मित्राविषयी तिच्या मैत्रीणीला सांगत आहे. (Shweta Your Mic is on)

#Shwetayourmicison : माईक ऑन ठेवून 'श्वेता'च्या चहाटळ गप्पा, Viral Zoom Call नेमका आहे तरी काय?
Shweta Your Mic is on हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्डिंग

मुंबई : झूम कॉलमुळे झालेल्या भयानक किश्श्यांची यादी काही केल्या संपताना दिसत नाही. श्वेता नावाची तरुणी या यादीतील लेटेस्ट नाव आहे. #Shweta_Your_Mic_is_on (श्वेता युअर माईक इज ऑन) हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्डिंगमध्ये आहे. याला निमित्त ठरलं ते झूम कॉलमध्ये माईक ऑफ करायचं विसरुन गेलेली कोणीतरी श्वेता नामक तरुणी. त्यानंतर मीम्स व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. बऱ्याच जणांनी तर मीम्स व्हायरल झाल्यानंतर श्वेताचा व्हायरल व्हिडीओ कॉल काय आहे, हे पाहण्यास सुरुवात केली. (Shweta Your Mic is on Viral Zoom Call Hashtag trends on Social Media)

काय आहे हा व्हिडीओ?

सोशल मीडियावर सध्या एका झूम क्लासची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये श्वेता नावाची तरुणी आपल्या सेक्स-अॅडिक्ट मित्राविषयी तिच्या मैत्रीणीला सांगत आहे. झूम क्लास सुरु असताना माईकऐवजी तिने स्पीकर ऑफ केला असावा आणि तिच्या चहाटळ गप्पा सुरु झाल्या.

श्वेताच्या गप्पा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला झूम क्लासमधील मित्रांना हसू आवरेना. ‘त्या मुलाने मला फोन करुन सांगितलं की तो आपल्या गर्लफ्रेण्डबद्दल खूप पझेसिव्ह आहे. म्हणजे त्याला मला सुचवायचं होतं.’ असं म्हणत तिने एका तरुणाची स्टोरी सांगायला सुरुवात केली.

श्वेता तुझा माईक ऑन आहे

जेव्हा तिच्या किश्श्यांनी खालची पातळी गाठायला सुरुवात केली, तेव्हा काही जणांनी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. श्वेता तुझा माईक ऑन आहे, असं अनेकांनी ओरडून सांगितलं. मात्र माईकऐवजी स्पीकर ऑफ केलेल्या श्वेतापर्यंत तिचा आवाज पोहोचूच शकला नाही. व्हिडीओच्या अखेरीस तर श्वेता तुझे किस्सा शंभर जणांनी ऐकलेत, असंही कोणीतरी म्हणालं. त्यानंतर कोणीतरी फोन करुन तिला वस्तुस्थितीची जाणीव करुन दिली असावी. घडल्या प्रकारानंतर श्वेताची अवस्था किती लाजिरवाणी झाली असेल, याची कल्पनाही न केलेली बरी.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

मीम्स व्हायरल

संबंधित बातम्या :

VIDEO : गुगल मिटींग सुरु आणि बायकोला किस करण्याचा मोह, कॅमेऱ्यात कैद ‘तो’ क्षण

VIDEO : पार्टीला ‘पावरी’ म्हणणारी पाकिस्तानी तरुणी प्रचंड ट्रोल, ‘PIB फॅक्ट चेक’चाही मौका पाहून चौका!

(Shweta Your Mic is on Viral Zoom Call Hashtag trends on Social Media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI