विमानाचं नाक म्हणजे काय? जे तुटल्यावर संपूर्ण फ्लाइट हादरते!

दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2142 मधील प्रवाशांनी नुकताच एक भयानक अनुभव घेतला. अचानक आलेल्या वादळी हवामानामुळे विमानाला तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या घटनेनंतर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये विमानाच्या पुढच्या भागाला म्हणजेच विमानाच्या ‘नाकाला’ मोठं नुकसान झालं असल्याचं स्पष्ट दिसून आलं. यामुळे अनेकांच्या मनात "विमानाचं नाक म्हणजे नक्की काय?" हा भाग तांत्रिकदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे आणि त्याचे कार्य काय असते, हे आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत

विमानाचं नाक म्हणजे काय? जे तुटल्यावर संपूर्ण फ्लाइट हादरते!
| Edited By: | Updated on: Jun 21, 2025 | 6:30 PM

दिल्लीहून श्रीनगरकडे जात असलेल्या इंडिगो फ्लाइट 6E2142 मध्ये बसलेले 220 हून अधिक प्रवासी एका भीषण अनुभवातून गेले. खराब हवामानामुळे विमानाला अचानक जोरदार हलके कंपने (टर्ब्युलन्स) जाणवले. त्यामुळे वैमानिकाने तातडीने एअर ट्राफिक कंट्रोलला (ATC) माहिती दिली आणि श्रीनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं, मात्र प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका प्रवाशाने शूट केलेल्या व्हिडीओमध्ये विमानाच्या बाहेर जोरदार ओले पडताना दिसत आहेत. विमान आतूनही जोरात हलत असल्याचं स्पष्ट जाणवतं. प्रवासी घाबरलेले असून, प्रार्थना करत असल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसते.

या संपूर्ण घटनेत विमानाच्या पुढच्या टोकदार भागाला, म्हणजेच विमानाच्या नाकाला, मोठं नुकसान झालं आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये हा भाग पूर्णपणे तुटलेला दिसतो. विमान श्रीनगरमध्ये सुरक्षित उतरलं असलं, तरीही ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.

विमानाचं नाक म्हणजे काय?

विमानाचा पुढचा टोकदार भाग, ज्याला आपण ‘विमानाचं नाक’ म्हणतो, तो फक्त सौंदर्यासाठी नसतो, तर त्यात अत्यंत महत्त्वाची तांत्रिक उपकरणं बसवलेली असतात. या भागाला तांत्रिक भाषेत ‘राडोम’ (Radome) म्हणतात जो ‘रडार’ आणि ‘डोम’ या दोन संज्ञांचं मिश्रण आहे.

राडोमचं महत्त्व काय?

विमानाचं नाक म्हणजे राडोम हे रडार प्रणालीचं संरक्षण करतं. यात असलेलं हवाई हवामान रडार (AWR) आकाशातील हवामान स्थिती तपासत राहतं. याच्या मदतीने वैमानिकांना वादळ, ढगांची स्तीथी आणि ओलावृष्टी यासारख्या गोष्टींचा अचूक अंदाज घेता येतो.

या रडार प्रणालीमुळे आकाशातील हवामानाची माहिती रंगांच्या स्वरूपात दाखवली जाते, ज्यामुळे ती लगेच समजते. हलक्या पावसासाठी हिरवा रंग, मध्यम पावसासाठी पिवळा रंग, जोरदार वादळासाठी लाल रंग, आणि गारपीटसारख्या अतिविषम हवामानासाठी जांभळा रंग वापरला जातो. हे रंग पाहून पायलटला हवामान कसं आहे हे लगेच कळतं आणि तो त्यानुसार योग्य आणि सुरक्षित निर्णय घेऊ शकतो.

इतर तांत्रिक यंत्रणा कोणत्या असतात?

राडोममध्ये ‘लोकलायझर अँटेना’ देखील असतो, जो ILS (Instrument Landing System) आणि GLS (Ground-based Augmentation System) चा भाग असतो. त्याच्या मदतीने पायलट रनवेवर विमान योग्य अँगलमध्ये उतरवू शकतो. तसंच ‘ग्लाइडस्लोप अँटेना’ ही एक प्रणाली असते जी विमानाच्या उतरण्याचा कोन (angle) नियंत्रित करत असते. विशेषतः छोटे किंवा जास्त उतार असलेले रनवे असलेल्या विमानतळांवर उतरताना हे अँटेना खूप महत्त्वाचे ठरतात.