कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरतं ते नेमकं काय? त्याचं काम कसं चालतं?

पण ते घुमट छतावर का लावतात, त्याचे नेमकं कारण काय? याची आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत. (What Is Turbo air Ventilator How Its Work)

कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरतं ते नेमकं काय? त्याचं काम कसं चालतं?
turbo-ventilator
| Updated on: May 11, 2021 | 1:22 PM

मुंबई : आपण आपल्याभोवती अशा बर्‍याच गोष्टी पाहतो ज्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायची प्रचंड इच्छा असते. पण कधीकधी आपल्याला त्याची योग्य ती माहिती मिळत नाही. आपण अनेकदा बाहेर फिरताना आजूबाजूला कारखान्यांच्या छतावर स्टेनलेस स्टीलचे बनवलेले छोटे घुमट दिसतात. सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चमकदार दिसणारे हे घुमट फिरताना फार चांगले दिसतात. पण ते घुमट छतावर का लावतात, त्याचे नेमकं कारण काय? याची आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत. (What Is Turbo air Ventilator How Its Work)

टर्बो व्हेंटिलेटरची अनेक नावे

अनेक कारखान्यांच्या छतावर बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे छोट्या घुमटाप्रमाणे दिसणाऱ्या या गोष्टीला टर्बो व्हेंटिलेटर (Turbo Ventilator) असे म्हणतात. तसेच एअर व्हेंटिलेटर (Air Ventilator), टर्बाइन व्हेंटिलेटर (Turbine Ventilator), रुफ एक्सट्रॅक्टर (Roof Extractor) यांसारख्या इतर नावानेही ओळखले जाते. सध्याच्या काळात टर्बो व्हेंटिलेटर हे केवळ कारखाने आणि मोठ्या स्टोअरमध्येच नाही तर इतर आवारातही लावले जातात. इतकंच नव्हे तर मोठ्या रेल्वे स्थानकांवरीही हे टर्बो व्हेंटिलेटर छतावर पाहायला मिळतात.

टर्बो व्हेंटिलेटरचे मुख्य काम काय?

कारखाने, रेल्वे स्थानक तसेच इतर ठिकाणी लावण्यात आलेले टर्बो व्हेंटिलेटरचे पंखे हे मध्यम गतीने चालतात. याचे मुख्य काम कारखान्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील गरम हवा बाहेर फेकणे असते. टर्बो व्हेंटिलेटरद्वारे गरम हवा बाहेर फेकली जाते. तर त्याचवेळी खिडकी किंवा दरवाज्यामधून नैसर्गिक वारे कारखान्यांमध्ये येतात. तसेच हे बराच काळ टिकतात. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना गरमीचा त्रास होत नाही.

विशेष म्हणजे टर्बो व्हेंटिलेटर गरम हवा बाहेर फेकण्यासोबतच कारखान्यातील दुर्गंध बाहेर टाकण्याचे काम करतो. इतकंच नव्हे तर हवामान बदलल्यानंतर ते आतील आर्द्रताही बाहेर फेकते.

मित्रांसोबतही शेअर करा माहिती

ही माहिती वाचल्यानतंर तुम्हाला टर्बो व्हेंटिलेटर काय असते, ते कसे काम करते? त्याचे मुख्य काम काय? याची माहिती मिळाली असेल. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्ही टर्बो व्हेंटिलेटर बघाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना याची माहिती नक्की देऊ शकता. (What Is Turbo air Ventilator How Its Work)

संबंधित बातम्या : 

गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण

Video | सारखा ड्रेस, सारखे हावभाव ; जुळ्या बहिणींचा मिरर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Happy Mothers Day | अनेक महिन्यांपासून नाही कापलेस केस, तरीही तू आहेस ‘ब्युटीफुल इन एनी केस’, मातृदिनाचे औचित्य साधत पोलिसांचे भन्नाट ट्वीट