Video | सारखा ड्रेस, सारखे हावभाव ; जुळ्या बहिणींचा मिरर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

जमैका देशातील दोन जुळ्या तरुण बहिणी व्हायरल होत आहेत. त्यांचा मेकअप, ड्रेसिंग, हावभाव अगदीच सारखे आहेत. (jamaica twins mirror dance video)

Video | सारखा ड्रेस, सारखे हावभाव ; जुळ्या बहिणींचा मिरर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
TWINS VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड होतात. यातील बऱ्याच व्हिडीओंमध्ये अकदीच कलात्मक पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी सादर केल्या जातात. काहितरी हटके आणि नवं कंटेट दिल्यामुळे काही व्हिडीओ तर काही क्षणात व्हायरल होतात. सध्या थेट जमैका देशातील दोन जुळ्या तरुण बहिणी व्हायरल होत आहेत. त्यांचा मेकअप, ड्रेसिंग, हावभाव अगदीच सारखे आहेत. त्यांच्या याच सारखेपणाची सध्या चर्चा होतेय. (Jamaica twins mirror dance video goes viral on Instagram acting exactly same)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

जमैका येथील दोन जुळ्या तरुणी इन्स्टाग्रामवर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. एकाच अकाऊंटवरुन त्या दोघी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करतात. त्यांनी अपलोड केलेले व्हिडीओज आणि फोटो नेहमी चर्चेचा विषय ठरतात. त्यांची नावं शारोना आणि कारोना असून आपल्या सारख्या दिसण्याचा फायदा उचलत त्यांनी चांगलंच डोकं वापरलंय. त्यांनी मिरर व्हिडीओ तयार केला आहे. एका तरुणीने आरशातील प्रतीमा म्हणून अभिनय केला आहे. तर एकीने आरशासमोर उभे राहून वेगवेगळे हावभाव  केलेयत. यामध्ये या दोन्ही बहिणी सारखेच हावभाव करताना दिसतायत. त्यामुळे सुरुवातीला व्हिडीओमध्ये दोन बहिणी नसून त्या एकच असल्याचा भास होतोय.

सारखेच हावभाव, सारखाच मेकअप

शारोना आणि कारोना यांनी एकदम हुबेहुब अभिनय केल्यामुळे सहळेच अवाक् झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दोन्ही जुळ्या बहिणींनी हुबेहुब मेकअप केला आहे. त्यांच्या हातातील ब्रेसलेटसुद्धा साऱखे आहे. नेल पॉलिशसुद्धा साऱखेच आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये दोन बहिणी नसून त्या एकच असल्याचे वाटते.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharonna and Karonna (@atkinstwins)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, शेवटी सत्य समोर ठेवत त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडलंय. या व्हिडीओमध्ये फक्त एकटीच तरुणी नसून आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत, असे त्यांनी हासत हासत दाखवले आहे. जुळ्या बहिणींचा हा व्डिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून शेकडो लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Happy Mothers Day | अनेक महिन्यांपासून नाही कापलेस केस, तरीही तू आहेस ‘ब्युटीफुल इन एनी केस’, मातृदिनाचे औचित्य साधत पोलिसांचे भन्नाट ट्वीट

VIDEO | टाटाची E-Car चार्ज करण्यासाठी गाडीवर पवनचक्की, कारमालकाचा प्रयोग फसला?

Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची ‘रॉयल एन्ट्री’ पाहाच

(Jamaica twins mirror dance video goes viral on Instagram acting exactly same)