न्यूड फोटो पाठवताना महिलांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? संशोधनातून आलं समोर

कशासाठी? महिला जेव्हा आपल्या जोडीदाराला आपले असे फोटो पाठवतात तेव्हा त्यामागे नेमकं कारण काय असतं? त्या नेमका काय विचार करत असतात? याच गोष्टीवर एक संशोधन करण्यात आलंय.

न्यूड फोटो पाठवताना महिलांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? संशोधनातून आलं समोर
what woman feels
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 10, 2023 | 11:33 AM

आजकाल ऑनलाइनचा जमाना आहे. ऑनलाइन प्रेम, ऑनलाइन डेटिंग, ऑनलाइन रोमान्स सगळंच! बरेचदा तुमच्याही ऐकण्यात आलं असेल की ऑनलाइन बोलताना कपल्स बऱ्याच गोष्टी शेअर करतात ज्यात न्यूड फोटोज, व्हिडीओजचा देखील समावेश असतो. ऑनलाइन असं सगळं पाठवणं किती सुरक्षित आहे हा भाग वगळता असं काही समजल्यावर नेमकं कपल्स असं का करतात असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडतो. न्यूड फोटो का? कशासाठी? महिला जेव्हा आपल्या जोडीदाराला आपले असे फोटो पाठवतात तेव्हा त्यामागे नेमकं कारण काय असतं? त्या नेमका काय विचार करत असतात? याच गोष्टीवर एक संशोधन करण्यात आलंय. हे प्रश्न अनेक महिलांना विचारण्यात आले, बघुयात यावर महिला नेमकं काय म्हणाल्या.

अनेक वेळा रात्री उशिरा गप्पा मारताना लोकांचे नियंत्रण सुटते. चॅटिंग करताना महिलांना अश्लील किंवा न्यूड फोटो मागितले जातात. महिलाही पाठवतात. पण महिलांना कसं वाटतं किंवा अश्लील किंवा न्यूड फोटो पाठवण्याचं कारण काय? यावर एक संशोधन समोर आलं असून, त्यात अनेक महिलांशी चर्चा करून त्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले.

नेब्रास्का विद्यापीठातील संशोधकांनी 19 ते 27 वयोगटातील 207 महिलांशी चर्चा करून न्यूड फोटो का पाठवले, असा प्रश्न विचारला. एक तृतीयांशपेक्षा जास्त स्त्रियांनी सांगितले की त्यांना असे वाटते की रोमँटिक नात्यासाठी असं करणं आवश्यक आहे. नात्यासाठी हा एक आवश्यक भाग आहे.”

मात्र कम्प्युटर्स इन ह्युमन बिहेविअर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या विषयावर अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. काही स्त्रियांनी कबूल केले की त्यांना त्यांच्या असं करताना संकोच वाटला होता. न्यूड फोटो पाठविण्यासाठी त्यांना कुणी प्रवृत्त केले हे सांगण्यास सुद्धा त्या असमर्थ होत्या.

आपल्या जोडीदाराचा प्रभाव आणि जोडीदाराकडून ज्या पद्धतीने प्रेम मिळालं त्यामुळे त्यांनी हे फोटो पाठवल्याचं इतर महिलांनी सांगितलं.

काही महिलांच्या मते त्यांना त्यांच्या शरीराबद्दल चांगले वाटते आणि त्यांना त्यांच्या रोमँटिक रिलेशनमध्ये पुढे जायचे आहे.

महिला विचार न करता आपले न्यूड फोटो दुसऱ्यांना पाठवत नाहीत, उलट त्यामागचा हेतू काय आहे, याची त्यांना जाणीव असते, असे संशोधकांना आढळून आले.

सर्वेक्षणातील सुमारे 35.3 टक्के महिलांनी ही नात्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यानंतर जवळपास 20.8 टक्के महिलांनी पार्टनरने फोटो मागितले म्हणून दिले असं उत्तर दिलं. 17.4 टक्के महिलांनी ब्रेकअप होऊ नये म्ह्णून त्या असं करतात असंही सांगितलं आणि 14 टक्के महिलांनी आपला पार्टनर नात्यात किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी असं करत असल्याचं सांगितलं.

काही महिलांनी तर आपल्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी न्यूड फोटो पाठवल्याचे सांगितले.