
डी-मार्टमध्ये अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते. ज्यामध्ये काही गोष्टी या एकावर एक फ्री देखील असतात.

पण जेव्हा तुम्ही हे सर्व सामान खरेदी करून त्याचे बिल भरून डी-मार्टच्या बाहेर पडण्यासाठी निघता तेव्हा तिथे सिक्युरिटी गार्ड उभा असतो.

तो सर्वात प्रथम तुमच्याकडे न बघता त्याचे लक्ष तो तुमच्या हातामध्ये असणाऱ्या ट्रॉलीकडे जाते. त्यानंतर तो तुमचे बिल बाहेर त्यावर शिक्का मारतो.

त्यामुळे तो सर्वात प्रथम तुमच्या हातामधील किंवा ट्रॉलीमधील बॅग किती आहेत ते बघतो. कारण त्या बिलावर त्यांची संख्या दिलेली असते. ज्यामध्ये C3 किंवा C2 असं लिहिलेलं असतं.

पण अनेकांना माहिती नाही की तो तुमच्या ट्रॉलीकडे का बघतो. याचा अर्थ असा आहे की, डी-मार्टमधून तुम्ही सामान खरेदी केल्यानंतर तुम्हाला कॅरी बँग दिली जाते. ज्याची संख्या त्या बिलावर असते.