सोनं-चांदी गुलाबी कागदातच का गुंडाळून देतात? 99% लोकांना नसेल माहीत, सोनारसुद्धा सांगणार नाही हे सीक्रेट

तुम्ही अनेकदा सोनं किंवा चांदी घेण्यासाठी दुकानात गेला असाल पण तुम्हाला माहिती आहे का की, सोनं घेतल्यानंतर ते गुलाबी रंगाच्या कागदामध्ये का देतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण.

| Updated on: Jan 23, 2026 | 3:57 PM
1 / 7
भारतामध्ये पिढ्यान्‌पिढ्या एक गोष्ट अगदी हमखास पाहायला मिळते. ती म्हणजे सोनं किंवा चांदी खरेदी करताना ते गुलाबी कागदात लपेटून देणं.

2 / 7
लहान शहरांमधील पारंपरिक सोनार असोत किंवा मोठ्या ब्रँडेड ज्वेलरी शोरूम्स, ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. बहुतांश ग्राहक याकडे केवळ सवय किंवा साधी पॅकिंग पद्धत म्हणून पाहतात.

3 / 7
मात्र, या गुलाबी कागदामागे शास्त्र, मानसशास्त्र, सुरक्षितता आणि धार्मिक श्रद्धा यांचा अनोखा संगम दडलेला आहे. जेव्हा एखादा ज्वेलर सोन्याची अंगठी, हार किंवा बांगडी फिकट गुलाबी कागदात ठेवून दाखवतो, तेव्हा तो नकळतपणे ग्राहकाच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम करत असतो.

4 / 7
तज्ज्ञांच्या मते, हा हलका गुलाबी शेड सोन्याच्या पिवळ्या झगमगाटाला संतुलित करतो. त्यामुळे सोनं फारच पिवळट किंवा भडक न दिसता अधिक रॉयल, क्लासी आणि महागडे वाटते. याच कारणामुळे तोच दागिना गुलाबी कागदात पाहिल्यावर अधिक आकर्षक भासतो.

5 / 7
मानसशास्त्रज्ञ सांगतात की गुलाबी रंग पाहणाऱ्याच्या मनात ‘नवीन, शुद्ध आणि सौम्य’ असा भाव निर्माण करतो. त्यामुळे दागिना पाहताना ग्राहकाला एक वेगळाच समाधानाचा आणि विश्वासाचा अनुभव मिळतो.

6 / 7
हा गुलाबी कागद फक्त दिसायला सुंदर नसतो तर तो अत्यंत मऊ असतो. त्यामुळे दागिन्यांची ने-आण करताना त्यावर रेगा पडण्याची शक्यता कमी होते.

7 / 7
विशेषतः सोनं आणि चांदीसारख्या मऊ धातूंसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.