चालताना Vladimir Putin यांचा एक हात नेहमी मागे का असतो?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहित असतील, पण चालताना ते एक हात हलवत नाहीत याकडे कधी तुमचं लक्ष गेलंय का?

चालताना Vladimir Putin यांचा एक हात नेहमी मागे का असतो?
Vladimir Putin Russia
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 04, 2023 | 5:25 PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहित असतील, पण चालताना ते एक हात हलवत नाहीत याकडे कधी तुमचं लक्ष गेलंय का? या कारणास्तव, बऱ्याच लोकांना असे वाटते की त्यांना एक आजार आहे. अनेकदा अशा अफवाही पसरल्या आहेत, पण काही खास कारणास्तव ते हा हात मागे ठेवतात. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला धक्का बसेल. खरे तर पुतिन यांनी गुप्तचर यंत्रणेत सेवा दिलीये. या सगळ्यामुळे त्यांना तिथे अनेक प्रकारचे प्रशिक्षणही मिळाले, तर जाणून घेऊया या रहस्याविषयी.

राष्ट्राध्यक्ष पुतिन चालताना उजवा हात हलवत नाहीत आणि फक्त डावा हात हलवण्याची त्यांची सवय आहे. ही स्टाइल गन स्लिंगर स्टाइल म्हणून प्रसिद्ध आहे. पुतिन आधी केजीबी (Komitet Gosudarstvennoy Bezopasnosti) चे जासूस होते.

त्यावेळी त्यांना अशा प्रकारे चालण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या स्टाईलमध्ये चालण्याचा फायदाही या जासूस लोकांना होत असतो कारण हे लोक नेहमी उजव्या हाताने शस्त्रे काढतात.

केजीबी (Komitet Gosudarstvennoy Bezopasnosti) सदस्यांना प्रशिक्षणात नेहमीच हे शिकवले जाते. ते आपला उजवा हात नेहमी शस्त्राजवळ ठेवतात आणि डाव्या हाताच्या बाजूने पुढे जातात. गरज पडल्यास शत्रूसमोर शस्त्रे काढता यावीत, यासाठी हे केले जाते. त्यामुळे केजीबीचे सर्व सदस्य असेच चालतात आणि पुतीन याचा कधीकाळी भाग होते त्यामुळे तेही असेच चालतात.