
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुम्हरिया गावात एक अतिशय अनोखी आणि धक्कादायक घटना घडली. एका कपलने अचानक लग्न केले. त्यानंतर सुहागरात झाल्यानंतर थेट दुसऱ्याच दिवशी एका निरागस मुलीला जन्म दिला आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आणि ही बातमी आगीप्रमाणे पसरली आहे. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
कुम्हरिया गावातील युवक रिजवान आणि बहादुरगंज गावातील एक युवती यांच्यात आधीपासून प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघांचे लग्न ठरले होते. काही दिवसांपूर्वी युवतीने मुरसैना चौकीवर जाऊन तातडीने लग्न करण्याची मागणी केली होती. पोलिस आणि ग्रामप्रधानांच्या (कुम्हरिया – अफरोज अली खान, बहादुरगंज – बबलू) मध्यस्थीने दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्न निश्चित झाले.
शनिवारी सायंकाळी सुमारे ८ वाजता नवरा पाच-सहा लोकांसोबत बहादुरगंज गावात पोहोचला आणि पारंपरिक पद्धतीने नवरीला कुम्हरिया गावातील आपल्या घरी घेऊन आला. लग्नानंतर घरात नवीन सूनचे स्वागत सुरू झाले आणि सर्वजण आनंदात होते.
रात्री अचानर पोटदुखू लागले
रात्री सुमारे १२ वाजता नवरीला तीव्र पोटदुखी सुरू झाली. कुटुंबीय घाबरले आणि लगेच जवळच्या महिला डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि रात्रभर निगराणी ठेवली. रविवारी पहाटे मुलीचा जन्म झाला. नवरीने एक निरोगी मुलीला जन्म दिला आहे. कुटुंबियांनी देखील नवरी प्रेग्नंट असल्याचे माहिती नव्हते.
आनंदाने वाटली मिठाई
घटनेची बातमी पसरताच घराबाहेर महिलांची आणि गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली. नवरीने मुलीला मांडीवर घेऊन आनंद व्यक्त केला आणि नवऱ्याने पिता झाल्याच्या आनंदात संपूर्ण गावात मिठाई वाटली. गावकरी आणि शेजारी या अनोख्या घटनेवर चर्चा करत होते.
पोलिसांची प्रतिक्रिया:
अजीमनगर थाना प्रभारी कारण सिंह यांनी सांगितले की, चौकी प्रभाऱ्याने तपास केला. तपासात समोर आले की, दोघांमध्ये आधीपासून संबंध होते आणि युवती गर्भवती होती. सध्या दोन्ही कुटुंबे एकत्र राहत आहेत आणि कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झालेली नाही, असे दोन्ही पक्षांनी सांगितले. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. प्रेम, जबाबदारी आणि अनपेक्षित प्रसूती यामुळे लोकांमध्ये आश्चर्य आणि हसू दोन्ही आहे.