नादच नाय! साडी नेसून जिम मध्ये, हुप्पा हैय्या…

जिममध्ये वर्कआऊट करण्याच्या बाबतीत महिलाही आता मागे नाहीत. तिच्या फिटनेसकडेही तिचं खूप लक्ष असतं.

नादच नाय! साडी नेसून जिम मध्ये, हुप्पा हैय्या...
Woman Doing workout in saree
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 10, 2023 | 6:01 PM

सध्याच्या काळात लोक आपल्या फिटनेसकडे जरा जास्तच लक्ष देताना दिसत आहेत. जिममध्ये चांगला आहार आणि वर्कआउट्स ही आता लोकांची रोजची कामं झालीत. ज्याप्रमाणे लोक विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त आहेत आणि मानवाचे सरासरी वय कमी होत आहे, त्याचप्रमाणे लोकांनी त्यांच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणे, तंदुरुस्त राहणे महत्वाचे आहे. जिममध्ये वर्कआऊट करण्याच्या बाबतीत महिलाही आता मागे नाहीत. तिच्या फिटनेसकडेही तिचं खूप लक्ष असतं.

साधारणतः महिला ट्रॅक सूट घालून जिम करताना दिसत असल्या तरी आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला ट्रॅक सूट नव्हे तर साडी नेसून वर्कआउट करताना दिसत आहे.

महिलेचा हा ग्रेट वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रीनासिंगफिटनेस नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 32 मिलियन म्हणजेच 3.2 कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 8 लाख 97 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ देखील लाईक केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, साडी नेसलेली महिला जिममध्ये कसा व्यायाम करत आहे. लहान मुलांसाठी खेळणी उचलल्याप्रमाणे ती मोठा टायर उचलून कसरत करत आहे.

साडी नेसून व्यायाम करणे सोपे काम नाही, कारण त्यात अडकून तोल जाण्याची भीती नेहमीच असते, पण या महिलेला अजिबात भीती नसल्याचे दिसते.

ती ज्या पद्धतीने वर्कआऊट करते, त्यावरून असे दिसते की तिला साडीतच वर्कआउट करण्याची सवय आहे.