चुकून तिने ब्रेक ऐवजी दाबला ॲक्सिलेटर!

गाडी चालवणाऱ्या महिलेने पार्किंग दरम्यान ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबला. यानंतर घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

चुकून तिने ब्रेक ऐवजी दाबला ॲक्सिलेटर!
car accident
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 20, 2023 | 5:43 PM

वडोदरा: सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असे व्हिडिओ नेटिझन्सचेही लक्ष वेधून घेतात. आता असाच एक व्हिडिओ गुजरातमधील वडोदरा येथून समोर आला आहे. जिथे एक अनियंत्रित कार क्रॉकरी स्टोअरमध्ये घुसली. झालं असं की, गाडी चालवणाऱ्या महिलेने पार्किंग दरम्यान ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबला. यानंतर घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दुकान मालकाने महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वडोदरा येथील अलकापुरी भागात बुधवारी रात्री एका महिला चालकाने चुकून क्रॉकरी स्टोअरला धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला.

गाडी पार्क करताना महिलेने चुकून ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय ठेवला. त्यामुळे गाडी पायऱ्या चढून शोरूममध्ये घुसली.

ही संपूर्ण घटना क्रॉकरीस्टोअरमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. शोरूम मालक महेशभाई सिंधानी यांनी पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ही महिला क्रॉकरी घेण्यासाठी दुकानात आली होती, मात्र कारच्या धडकेमुळे शोरूमच्या एका बाजूच्या संपूर्ण काचा तुटल्या, तर लाखो रुपये किमतीची क्रॉकरी जळून खाक झाली. काच फुटण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक हैराण झाले.

शोरूमच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, कार काचेवर आदळताच त्याचा आवाज ऐकून ते खूप घाबरले. सुदैवाने या महिलेसह शोरूममधील एकाही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही.ही.