व्हिडीओ बघताना लोकांना रानू मंडल आठवली, आवाज त्याहीपेक्षा वरचढ

या बाईचा आवाज इतका सुंदर आहे की, तुम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल.

व्हिडीओ बघताना लोकांना रानू मंडल आठवली, आवाज त्याहीपेक्षा वरचढ
singing video viral
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 13, 2022 | 4:52 PM

रानू मंडल आठवतेय? रातोरात फेमस झालेली रानू मंडल अचानक गायब झाली. अशीच एक महिला पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतीये. रानू मंडल प्रमाणेच आणखी एका महिलेने लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्या व्हिडीओने आपल्या सुरेल आवाजानं लोकांची मनं जिंकली आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही महिला 1966 मध्ये आलेल्या ‘आये बहार के’ चित्रपटातील ‘सुनो सजना पपीहे ने’ हे गाणे गुणगुणताना दिसत आहे.

या बाईचा आवाज इतका सुंदर आहे की, तुम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल. या महिलेचा व्हिडिओ पाहून लोकांना रानू मंडल यांची आठवण झाली आहे.

मात्र, रानू मंडल यांच्यापेक्षा ही स्त्री कितीतरी पटीने सुमधुर आणि सरस असल्याचं लोक सांगतायत. ही महिला महाबळेश्वरमधील पाचगणी येथील पारसी पॉईंट इथे उभी असताना सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला, जो व्हायरल झाला आहे.

salman_sayyed_7715 नावाच्या अकाऊंटसह हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सलमान सय्यदने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याचा आवाज खूप गोड आहे, कृपया त्यांना सपोर्ट करा’.

15 नोव्हेंबरला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 85 हजार लोकांनी लाईक केलं आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर लोकांनी यावर भरघोस कमेंट केलेल्या आहेत.