
कलिंगड हे एक असं फळ आहे, जे उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ताजेतवानं ठेवते. दरवर्षी August 3 रोजी ‘राष्ट्रीय कलिंगड दिवस’ साजरा केला जातो. आज आपण एका अशा कलिंगडाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं वजन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हे कलिंगड इतकं मोठं होतं की त्याला उचलायला क्रेनची मदत घ्यावी लागली. चला, जाणून घेऊया जगातील सर्वात मोठा कलिंगड कोणी आणि कुठे पिकवला.
जगातील सर्वात जड कलिंगड कोणी पिकवलं ?
हाे कलिंगड जगासाठी चर्चेचा विषय बनलां होतं. या विशाल कलिंगडाचं वजन इतकं होतं की त्याला सामान्य माणसाने उचलणं शक्यच नव्हतं. 2013 साली अमेरिकेच्या क्रिस केंट यांनी हे कलिंगड पिकवलं होतं. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून या कलिंगडाचे वजन तब्बल 159 किलो भरले, जे ‘द वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक’ मध्ये नोंदवलं गेलं. हे कलिंगड एका साधारण कलिंगडापेक्षा 15 पट जास्त जड होतं, त्यामुळे त्याला उचलण्यासाठी विशेष यंत्रणा लागली.
क्रेनचा वापर का करावा लागला ?
क्रिस केंट यांनी स्वतःच्या खास बियांपासून हा कलिंगड पिकवला होता. प्रदर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी त्याला क्रेनचा वापर करून उचलण्यात आलं. हे बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. या कलिंगडाला क्रेनने उचलून एका खास जागी ठेवले होते, जेणेकरून त्याचे वजन आणि आकार सर्वसामान्यांना पाहता येईल.
भारतातील कलिंगड उत्पादन
भारतात कलिंगडाची शेती उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात एकूण कलिंगड उत्पादन सुमारे 2,495 हजार मेट्रिक टन आहे. कलिंगडात सुमारे 92% पाणी असल्यामुळे ते शरीराला थंड ठेवतं आणि पाण्याची कमतरता दूर करतं. याशिवाय, कलिंगडात अनेक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
भारतात कोणत्या राज्यात जास्त उत्पादन होते?
उत्तर प्रदेश हे भारतात सर्वात जास्त कलिंगडाचे उत्पादन करणारे राज्य आहे. येथील सुपीक जमीन आणि हवामान कलिंगड पिकवण्यासाठी खूप अनुकूल आहे. 2021-22 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये कलिंगडाची शेती 16.86 हजार हेक्टर जमिनीवर झाली होती, जे भारतातील एकूण उत्पादनाचा सर्वात मोठा भाग होता. 2024 मध्येही यूपीमध्येच कलिंगडाची सर्वाधिक शेती झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला.