उडणाऱ्या कारचा जगातला पहिला व्हर्टिकल टेक ऑफ व्हिडीओ जारी, फ्लाईंग कारची किंमत किती ?

अमेरिकन कंपनी अलेफ एरोनॉटिक्सने उडणाऱ्या कारचा पहिला व्हिडिओ जारी केला आहे, ही कार जेम्स बाँडच्या चित्रपटाप्रमाणे एखाद्या वैज्ञानिक फँटसी मुव्हीप्रमाणे भासते...

उडणाऱ्या कारचा जगातला पहिला व्हर्टिकल टेक ऑफ व्हिडीओ जारी, फ्लाईंग कारची किंमत किती ?
flying car video
| Updated on: Feb 23, 2025 | 4:26 PM

ट्रॅफीक जामची समस्या केवळ आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगातील सर्व मोठ्या शहरातील समस्या आहे. यातून सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरु आहेत. विचार करा जर तुम्ही तासांहून अधिक काळ ट्रॅफक जाममध्ये अडकला असाल आणि तुमच्याकडे जर अशी कार असेल जी तुमची सुटका ट्रॅफीक जाममधून झटक्यात करू शकेल.असा विचार करणे हा देखील स्वप्नासारखाच प्रकार आहे. परंतू अमेरिकेतील एका ऑटो कंपनीने हे स्वप्न सत्यात उतरवून दाखविले आहे.

अमेरिकेची कार कंपनी अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने आकाशात उडणाऱ्या कारचा पहिला व्हिडीओ जारी केला आहे. ही कार जेम्स बाँडच्या कारप्रमाणे फँटसी वाटते. कॅलिफोर्नियाने या कार निर्मिती कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक कारचा रस्त्यावर अन्य एका कारच्या वरुन उडतानाचा फुटेज जारी केला आहे. या कारला शहरात चालविण्यासाठी रन वे ची गरज नाही. यासाठी व्हर्टिकल टेकऑफची त्याला सुविधा दिलेली आहे. या कारचा व्हर्टिकल टेक ऑफचा हा जगाच्या इतिहासातील पहिला व्हिडीओ जारी केल्याचा दावा कंपनीने केला आङे. या व्हिडीओ फूटेजमध्ये कारला व्हर्टिकल टेक ऑफ घेताना पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आङे. आतापासून या कारला खरेदी करण्याचा मनसुबे लोक रचू लागले आहेत.

प्रोपेलर ब्लेडला कव्हर करणाऱ्या जाळीदार बॉडीसह ही कार इलेक्ट्रीक प्रपोलेजनचा वापर करुन कार जमीनीवरुन वर उडण्यासाठी सक्षम आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या एका अहवालानुसार कंपनीने ट्रायलसाठी एक प्रोटोटाईपचा वापर केला तर जातो. एलेफ मॉडेल झीरोची एक अल्ट्रालाईट आवृत्ती आहे.

उडणाऱ्या कारचा व्हिडीओ येथे पाहा –

किती असणार किंमत ?

या कारला अजूनपर्यंत बाजारात उतरविण्यात आलेले नाही. या कारच्या किंमतीची चर्चा यापूर्वीपासून सुरु आहे, अलेफ एरोनोटच्या मते या उडणाऱ्या कारची किंमत २.५ कोटी रुपये आहे. एका सामान्य कारसारखी ती रस्त्यावर ती चालू शकते.