खूपच सुंदर असणारा “जगातला सर्वात वयस्कर पक्षी”, अंदाजे वय किती असेल? वाचा

या पक्ष्याचे वय जाणून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

खूपच सुंदर असणारा जगातला सर्वात वयस्कर पक्षी, अंदाजे वय किती असेल? वाचा
oldest bird in the world
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 14, 2022 | 1:32 PM

जगातील सर्वात जुना पक्षी किती वर्षांचा असेल याचा कधी विचार केला आहे का? किंवा तो कसा दिसत असेल. सोशल मीडियावर एका पक्ष्याचा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. अल्बाट्रॉस प्रजातीच्या या पक्ष्याचे नाव विस्डम आहे. जगातील सर्वात जुना पक्षी म्हणून अमेरिकन फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस पॅसिफिकने त्याचे वर्णन केले आहे. नुकताच हा पक्षी अमेरिकेला परतला. वन्यजीव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पक्षी किमान 71 वर्षांचा आहे. या पक्ष्याचे वय जाणून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही युझर्सनी सांगितलं की, हा पक्षी माझ्या आजोबांपेक्षा वयाने मोठा आहे.

Wisdom Bird

हे फोटो 8 डिसेंबर रोजी ट्विटर हँडल @USFWSPacific वरून शेअर करण्यात आले होते, त्याला “जगातील सर्वात जुना वन्य पक्षी” म्हणून कॅप्शन दिले होते.

हा पक्षी नुकताच अमेरिकेतील मिडवे ॲटोल नॅशनल वाइल्डलाइफ रिफ्यूजमध्ये परतला होता. अल्बाट्रॉस प्रजातीचा हा पक्षी किमान 71 वर्षांचा आहे.

जीववैज्ञानिकांनी 1956 मध्ये ‘विस्डम’चा प्रथम शोध घेऊन बँडिंग केली. असा अंदाज आहे की, विस्डमने आपल्या आयुष्यात 50-60 अंडी आणि 30 पेक्षा जास्त पिल्लांना जन्म दिला आहे.