Video: माणिके मागे हितेचं गुजराती व्हर्जन इंटरनेटवर हीट, गाणं ऐकून नेटकरी दंग!

आता गुजराती व्हर्जन इन्स्टाग्राम युजर यशश्री गिरीने अपलोड केले आहे. व्हिडिओ 3k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेलं आहे. व्हायरल होत असलेली क्लिप मागील महिन्यात इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आली होती.

Video: माणिके मागे हितेचं गुजराती व्हर्जन इंटरनेटवर हीट, गाणं ऐकून नेटकरी दंग!
माणिके मागे हितेचं गुजराती व्हर्जन
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 4:29 PM

माणिक हे मागे हिते या गाण्याचं गुजराती व्हर्जनही आता इंटरनेटवर चांगलंच गाजतं आहे. ज्यामध्ये दोन मुली गुजरातीमध्ये लोकप्रिय सिंहला गाणे गाताना दिसत आहेत. श्रीलंकेची गायिका योहानी डिलोका दी सिल्वा हिला तिच्या माणिक मागे हितेमुळे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. योहानीने गायलेले हे गाणे लोकांना इतके आवडले आहे की ते प्रत्येक भाषेत त्याचे व्हर्जन काढत आहेत. ( Yohani De Silva Manike Mage Hithe Gujarati version goes viral)

आता गुजराती व्हर्जन इन्स्टाग्राम युजर यशश्री गिरीने अपलोड केले आहे. व्हिडिओ 3k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेलं आहे. व्हायरल होत असलेली क्लिप मागील महिन्यात इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आली होती. सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत.

व्हिडीओ पाहा:

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन मुली गुजराती गाणे गाताना दिसत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांना खूप आकर्षित करत आहे. मुलींचा आवाज लोकांची मने जिंकत आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. याआधी एका 9 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याला युजर्सचे खूप प्रेम मिळाले होते.

योहानीचे हे गाणे (माणिक मग हिते) हिंदी भाषेत नसले तरी योहानीच्या जादुई आवाजावर लोकांना विश्वास बसला आहे. या गाण्यामुळे योहानीला आता बॉलिवूडमध्येही गाण्याची संधी मिळाली आहे. योहानी ही श्रीलंकेतील कोलंबोची रहिवासी आहे. ती एक गायक, गीतकार, रॅपर आणि संगीत निर्माता आहे. तिला श्रीलंकेची ‘रॅप प्रिन्सेस’ म्हणूनही ओळखले जाते.

हेही पाहा:

Video: विटा इमारतीवर नेण्यासाठी देसी जुगाड, स्कुटरचा वापर करुन भन्नाट आयडिया!

Video: अॅमेझॉनच्या डिलीव्हरी व्हॅनमधून तरुणी बाहेर पडली, व्हायरल व्हिडीओनंतर ड्रायव्हर सस्पेंड