
Viral Video : दूर राहणाऱ्या मित्रांशी, नातेवाईकांशी संपर्क साधता यावा, संवाद चालू राहावा यासाठी अगोदर सोशल मीडियाचा उपयोग होत असे. काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर आता अर्थार्जन करण्यासाठी होत आहे. पैसे कमवण्याच्या लालसेपोटी आता लोक वेगवेगळ्या पद्धतीचा कन्टेंट क्रिएट करत आहेत. असे असतानाच आता सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब दाखवण्यात आलं आहे. हे अख्खं कुटुंब सिगारेट पित आहे. विशेष म्हणजे घरातील सूनबाई आपल्या सासूबाईंसोबतच सिगारेट ओढत असताना या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.
हा व्हिडीओ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र व्हिडीओतील महिलेने मी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत सिगारेट ओढते, असा दावा केला आहे. सामान्य कुटुंबात सिगारेट ओढणं हे वाईट व्यसन समजलं जातं. विज्ञानानुसार सिगारेटच्या व्यवसनामुळे कर्करोगाची भीती वाढते. असे असताना या व्हिडीओतील महिला मात्र बिनदिक्कतपणे आपल्या कुटुंबासमोरच सिगारेट ओढताना दिसत आहे. म्हणूनच हा व्हिडीओ पाहून सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
या व्हिडीओमध्ये एक कुटुंब दिसत आहे. या कुटुंबात दोन महिला आहेत. यातील एक महिला ही सून तर एक सासूबाई असल्याचे म्हटले जात आहे. यातीलच कविता नावाच्या महिलेने माझी सून माझ्यासोबत सिगारेट ओढते असा दवा केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत सासूबाईच आपल्या सूनेला सिगारेट देत असल्याचे दिसत आहे.
व्हिडीओध्ये कविता यांची सून, मुलगा आणि पती दिसत आहेत. हा संपूर्ण परिवारच सोबत सिगारेट ओढताना या व्हिडीओत दिसत आहे. तुमची सून सिगारेट ओढते तुम्हाला काय वाटतं? असं विचारल्यानंतर यात गैर काय आहे? ती आमच्या संपूर्ण कुटुंबासोबतच सिगारेट ओढत आहे, असं स्पष्टीकर एक महिला देताना दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिीडओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.