
आजकाल सोशल मीडियाच्या युगात लोकांना फेमस होण्याची, प्रसिद्धीची एवढी घाई असते की ते कोणताही अजब, विचित्र कंटेट बनवून देखील फेमस होऊ इच्छिता. कोणी नाचत-गात असतं, तेही ठीक आहे, कारण ते त्यांची कला दाखवत असतात. पण काही लोकांनी तर हद्दच पार केली आहे. आता सोशल मिडीयावर एका तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.खरंतर तो पाहूनच तो व्हिडीओ फेक असावा असं वाटतंय पण त्यात ती जे बोलली आहे, ते अतिशय विचित्र आहे. खरंतर ती मुलगी लग्नासाठी एखादा मुलगा, वर शोधत्ये पण तिची डिमांड अतिशय अजब आहे. तिला दारूबाज मुलगा हवा आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती हुंडा देण्यासाठी तयार आहे.
इन्स्टाग्रामचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवरील @desh_bandhu_media या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये एक तरूणी बोलताना दिसत आहे. त्या व्हिडीओत ती तरूणी म्हणते, मला दारू पिणारा मुलगा हवा आहे. एका पार्कमध्ये उभं राहून, अगदी नटून-सजून ती मुलगी हे सगळं बोलते, तिच्या शेजारी एक इसम माइक घेऊन उभा आहे. तो तिला विचारतो की तुला कसा मुलगा हवा आहे लग्नासाठी. त्यावर ती तरूणी म्हणते मला दारू पिणारा मुलगा हवाय.
नवरा म्हणून दारू पिणारा मुला हवा, तरूणीची अजब मागणी
तिचं उत्तर एकून तो मुलगा तिला विचारतो, मग हुंडाही मिळेल ? त्यावर ती मुलगी म्हणते की हो, हुंडा म्हणून एकूण 5 लाख रुपये मिळतील. एवढंच नव्हे तर बुलेट आणि दीवाणही मिळेल. पण तरूणीचा हा व्हिडीओ पाहून लोकं त्याला फेक म्हणत आहेत. फक्त व्हायरल होण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केल्याची टीकाही लोकं करत आहेत.
व्हिडीओवर अनेक कमेंट्स
हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे- दारू पिणाऱ्यांनी त्यांची हजेरी द्यावी. तर दुसऱ्यानेही कमेंट केली की शेवटी ती ड्रममध्येच टाकेल. या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या मित्रांनाही टॅग केले आहे.