Crypto : या अॅपच्या चक्करमध्ये बिलकूल अडकू नका, 31 जणांना लाखोंना गंडवले की राव..

| Updated on: Oct 12, 2022 | 9:10 PM

Crypto : डिजिटलच्या या युगात तुम्हाला गंडा घालण्याचे अनेक युक्त्या वापरल्या जातात..त्यातीलच ही युक्ती...

Crypto : या अॅपच्या चक्करमध्ये बिलकूल अडकू नका,  31 जणांना लाखोंना गंडवले की राव..
कमाई सोडा, जे होते तेही पळविले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : डिजिटल युगात (Digital Era) आवळा देऊन कोहळा काढण्याचे (Fraud) अनेक प्रकार आपण प्रत्येक दिवशी वाचतो, बघतो. पण त्यातून बोध घेणारे अत्यंत कमी आहे. पोलिस यंत्रणा अनेक वेळा सजग (Alert) राहण्याचे आवाहन करते. पण आपण सजग राहतोच असे नाही आणि मग लोभापायी आपण आपल्याकडील रक्कमही गमावतो. असाच एक प्रकार राज्यात घडला आहे..

राज्यातील सोलापूर येथील 31 जणांना तब्बल 45 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या लोकांनी क्रिप्टो क्लाऊड मायनिंग अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक केली होती. पण त्यांची फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हे मोठे रॅकेट असल्याचे समोर येत आहे.

क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीसाठी हा अत्यंत अविश्वासार्हय पर्याय आहे. क्लाऊड मायनिंग ही अशी सिस्टिम आहे, जी भाड्याने घेतलेल्या क्लाऊड कम्युटिंग सर्व्हरचा वापर करते. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करताचा त्याचा वापर करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

या फसवणूक प्रकरणात गुंतवणूकदारांना क्लाउड मायनर अॅप आणि क्रिप्टो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यांना भारतीय रुपया डॉलरमध्ये बदलण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या फसवणुकीत गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 31 लोकांनी तक्रार दाखल केली आहे.

क्रिप्टोत गुंतवणूक करण्यासाठी शॉर्ट-कट पद्धतीचा वापर होईल. पैसेही वाचतील.  त्यातून लाखोंची कमाई करता येईल. सरकारला कर देण्याची गरज राहणार नाही, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. पण हे गुंतवणूकदारांनाच अडकविण्यासाठी जाळे विणण्यात आले होते हे स्पष्ट झाले आहे.

गुंतवणूकदारांना चूना लावल्यानंतर हे फसवणूक करणारे अॅप बंद झाले आहे. एवढेच नाही तर या कंपनीचे तीन कार्यालयांनाही ताळे लागले आहे. ही कंपनी इतर ठिकाणी गुंतवणूकदारांना गंडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला ही या भामट्यांपासून सावध रहावे लागेल.